मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील 8 मंत्री पराभूत

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election Result) आज (24 ऑक्टोबर) निकाल लागला. या निकालाने सर्वेच अंदाज चुकीचे ठरवले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील 8 मंत्री पराभूत

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election Result) आज (24 ऑक्टोबर) निकाल लागला. या निकालाने सर्वेच अंदाज चुकीचे ठरवले आहेत. या निवडणुकीने अनेक दिग्गजांना पराभवाची धुळ चारली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील भाजप-शिवसेनेचे तब्बल 8 विद्यमान मंत्र्यांचाही (Defeated Minister of BJP Shivsena) पराभव झाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील पराभूत मंत्र्यांमध्ये 2 कॅबिनेट मंत्र्यांचा तर 6 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील पराभूत मंत्री

  1. महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे
  2. रोजगार आणि फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर
  3. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राम शिंदे
  4. कामगार आणि पर्यावरण राज्यमंत्री बाळा भेकडे
  5. जलसंपदा आणि जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे
  6. कृषी राज्यमंत्री अनिल बोंडे आणि कापड
  7. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यपालन राज्यमंत्री अर्जून खोतकर
  8. जंगल, सार्वजनिक बांधकाम आणि आदिवासी विकास राज्यमंत्री परिणय फुके

भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा परळीतून पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांनी 30,701 मतांनी पराभव केला. धनंजय मुंडे यांना 122114 मते मिळाली, तर पंकजा मुंडे यांना 91413 मते मिळाली. मुंडे बहिण भावामधील ही लढत चांगलीच रंगली होती.

पशुसंवर्धन दुग्धविकास राज्यमंत्री आणि जालना विधानसभेचे शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर (Shivsena Arjun Khotkar Jalna) यांच्या नशिबी सलग विजय नसल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. खोतकर यांना काँग्रेसमधील त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी कैलास गोरंट्याल यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे एक आड एक विधानसभेला पराभूत होण्याची खोतकरांची परंपरा कायम राहिली आहे.

अर्जुन खोतकर यांचा 16 हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव झाला आहे. 1990 पासून सलग सातव्यांदा खोतकर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. मात्र 1995 मध्ये दुसऱ्यांदा आमदारकी मिळवल्यानंतर एक आड एक विधानसभा निवडणुकांमध्येच ते जिंकत आले आहेत.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI