भाजपच्या स्टार प्रचारकांमध्ये नाव, पण खडसे मुक्ताईनगरमध्येच अडकून

एकनाथ खडसे यांचं भाजपच्या विधानसभेच्या स्टार प्रचारक यादीत (BJP star campaigners Eknath Khadse) नाव आहे. पण सद्यस्थितीत ते मुक्ताईनगर येथे कार्यकर्ते आणि मतदार यांच्या बैठका आणि सभा घेण्यात व्यस्त आहेत.

BJP star campaigners Eknath Khadse, भाजपच्या स्टार प्रचारकांमध्ये नाव, पण खडसे मुक्ताईनगरमध्येच अडकून

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (BJP star campaigners Eknath Khadse) निवडणुकांमध्ये नेहमीच महत्त्वाची भूमिका निभावतात. पण यावेळी त्यांचं तिकीट कापून मुलगी रोहिणी खडसे यांना भाजपने उमेदवारी दिली. पक्षाचा निर्णय म्हणून खडसे यांनीही त्याचा आदर केला. एकनाथ खडसे यांचं भाजपच्या विधानसभेच्या स्टार प्रचारक यादीत (BJP star campaigners Eknath Khadse) नाव आहे. पण सद्यस्थितीत ते मुक्ताईनगर येथे कार्यकर्ते आणि मतदार यांच्या बैठका आणि सभा घेण्यात व्यस्त आहेत.

2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर खडसे यांचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर होतं. पक्षाचे जुने नेते आणि पक्षाला इथपर्यंत आणणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. पण गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर राज्यातील आणि केंद्रातील भाजपची स्थिती बदलली. प्रस्थापित नेत्यांचं महत्त्व कमी झाल्याचं दिवसेंदिवस दिसून आलं.

खडसे यांना मुख्यमंत्रीपद दिलं गेलं नसलं तरी त्यांची ज्येष्ठता लक्षात घेऊन त्यांच्याकडे अनेक खाती सोपविण्यात आली. पण त्यांच्यावर झालेल्या कथित आरोपांमुळे खडसेंना राजीनामा द्यावा लागला. या निवडणुकीत तर त्यांच्यावर पक्षाकडे स्वतः उमेदवारी मागण्याची वेळ आली. परंतु पक्षाने त्यांना उमेदवारी न देता त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली.

पक्षाने दिलेला हा निर्णय खडसे यांनी मान्य केला आणि ते प्रचाराला लागले. परंतु सध्या ते मुक्ताईनगरमध्ये मतदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या बैठक घेताना दिसत आहेत. तर प्रचाराची धुराही खुद्द उमेदवार रोहिणी खडसे आणि खासदार रक्षा खडसे यांच्यावर असल्याचं दिसून येत आहे. कारण, प्रत्येक गावागावात जाऊन ते प्रचार करताना दिसत आहेत.

विधानसभा निवडणुकीत भाजपच्या स्टार प्रचारकाच्या यादीत एकनाथ खडसे यांचं नाव आहे. परंतु अजूनही ते राज्यात प्रचाराला गेले नाहीत. मागील विधानसभा निवडणुकीत राज्यात प्रचार करून भाजपला जागा मिळवून देणारे खडसे आज राज्यात प्रचार करण्यास मिळण्यासाठी इच्छुक आहेत. परंतु अजूनही पक्षाकडून त्यांना आदेश मिळाला नसल्याने ते फक्त आपल्या मतदारसंघात बैठकांच्या माध्यमातून प्रचार करत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *