प्रसाद लाड यांच्या स्वागताला राजपुत्र, मुंबईत भाजप-मनसे युतीचं पहिलं चित्र?

मुंबई महापालिकेवर (BMC Election 2021) भाजपचा भगवा फडकवण्याचा निर्धार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी केला आहे.

प्रसाद लाड यांच्या स्वागताला राजपुत्र, मुंबईत भाजप-मनसे युतीचं पहिलं चित्र?
प्रसाद लाड, अमित ठाकरे
Follow us
| Updated on: Jan 23, 2021 | 2:16 PM

मुंबई : भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. या भेटीनंतर भाजप-मनसेच्या (BJP MNS) जवळीकीची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. मुंबई महापालिकेवर (BMC Election 2021) भाजपचा भगवा फडकवण्याचा निर्धार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी केला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी होत आहे. मात्र त्यासाठी भाजपने आतापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केल्याचं दिसतंय. राज्यात शिवसेने सोडलेल्या साथीनंतर, भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यासाठीच शिवसेनेची मुंबई महापालिकेतील सत्ता उलथवून टाकण्यासाठी भाजप शक्य ते सर्व करेल, असा निर्धार भाजप आमदार प्रसाद लाड यांनी बोलून दाखवला आहे.

भाजप आमदार प्रसाद लाड हे जवळपास पाऊणतास कृष्णकुंजवर होते. त्यांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. मात्र या चर्चेतील मुद्दे कोणते होते, हे प्रसाद लाड यांनी सांगितलं नाही. प्रसाद लाड हे कृष्णकुंजवर आले तेव्हा त्यांचं स्वागत दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर खुद्द राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी केलं.

प्रसाद लाड यांच्या स्वागताला राजपुत्र 

प्रसाद लाड हे तसे राज्यातील बडे नेते नाहीत. ना त्यांनी कोणतंही मंत्रिपद भूषवलं आहे. पण तरीही प्रसाद लाड यांच्या स्वागताला राजपुत्र अमित ठाकरे आले. तसं पाहता घरी येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत घरचे मंडळी करतात, ही संस्कृती आहेच. मात्र राजकारणात कोण कोणाचं स्वागत करतं याला विशेष महत्त्व आहे. प्रसाद लाड हे देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मानले जातात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा कोणता निरोप घेऊन प्रसाद लाड यांनी राज ठाकरेंची भेट घेतली का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

प्रसाद लाड काय म्हणाले? 

माझे आणि राज ठाकरे यांचे वैयक्तिक संबंध आहेत, असं प्रसाद लाड म्हणाले. तसंच ही भेट वैयक्तिक असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र त्यांना मुंबई महापालिका निवडणुकीबाबतही प्रश्न विचारण्यात आला. शिवसेनेची परंपरागत सत्ता खाली करण्यासाठी जे करता येईल ते करु, असा निर्धारही प्रसाद लाड यांनी व्यक्त केला. ‘कृष्णकुंज’वरुन बाहेर येताच प्रसाद लाड यांनी भारतीय जनता पार्टीचा निर्धार, मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा, अशी बोलकी प्रतिक्रिया दिली.

मनसे-भाजप युती होऊ शकते का?

शिवसेनेने भाजपची साथ सोडल्यानंतर, भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. शिवसेनेने महाविकास आघाडीसोबत राज्यात सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे भाजपला हा वचपा काढायचा आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेतील शिवसेनेची सत्ता उलथवून टाकून शिवसेनेला सर्वात मोठा हादरा देण्याचा निर्धार भाजपने केला आहे. भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीसाठीचं ‘भाजप येणार, मुंबई घडवणार’ हे घोषवाक्य (BJP’s Slogan BMC election) जाहीर केलं आहे. मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवण्याचा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेची जवळीक वाढली आहे.

दुसरीकडे मनसेला गेल्या महापालिका निवडणुकीत 7 नगरसेवक निवडून आले होते. पण मनसेचे तत्कालिन गटनेते दिलीप लांडे यांनी सहा नगरसेवकांना घेऊन बंड केलं. त्यानंतर दिलीप लांडे यांनी सहा नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आता मनसेचा एकच नगरसेवक उरला आहे.  शिवसेनेने आपले नगरसेवक फोडल्याचा राग मनसेला आहे. त्यामुळे सेनेला धडा शिकवण्याचा चंग मनसेनेही बांधला आहे.

दोघांचा दुश्मन एक 

सध्याच्या परिस्थितीत मनसे आणि भाजप या दोन्ही पक्षांचा शिवसेना हा एकच दुश्मन आहे. दोघांचं टार्गेट एक आहे. समोर मैदान एक आहे. या मैदानात एकी दाखवून, भाजप आणि मनसे हे शिवसेनेची जवळपास तीन दशकांची सत्ता उलथवून टाकणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवून शिवसेनेचा माज उतरवू, अशी गर्जना देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकारिणीच्या नोव्हेंबरच्या बैठकीत केली होती. आगामी निवडणुकीत भाजपचाच विजय होईल. 2022 साली मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकणार आहे. राजाचा जीव जसा पोपटात अडकलेला असतो, तसा काहींचा जीव महापालिकेत अडकलेला असल्याचा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेचं नाव न घेता लगावला होता.

दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेसोबत युती करण्याचे भाजप नेत्यांकडून संकेत देण्यात येत असले तरी भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसेसोबतच्या युतीचे वृत्त फेटाळून लावले होते. आगामी सर्व निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यापूर्वी स्पष्ट केलं होतं.

काळ बदलला, वेळ बदलली

सध्याची राजकीय परिस्थिती पाहता काळ आणि वेळ बदलली आहे. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कोणी कोणाचा कायमचा मित्रही नसतो असं म्हणतात. ही म्हण महाराष्ट्राने महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेने प्रत्यक्षात पाहिली आहे. आता भाजप आणि मनसे एकत्र येऊन, त्याची पुनरावृत्ती करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मुंबई महापालिका संख्याबळ

एकूण जागा: 227

बहुमताचा आकडा: 114

शिवसेना: 97

भाजप: 83

काँग्रेस: 29

राष्ट्रवादी काँग्रेस: 8

समाजवादी पार्टी: 6

एमआयएम: 2

मनसे: 1

अभासे: 1

VIDEO – प्रसाद लाड कृष्णकुंजवर राज ठाकरे यांच्या भेटीला

Is BJP-MNS alliance possible in BMC?

संबंधित बातम्या  

‘शिवसेनेची सत्ता उलथवण्यासाठी शक्य ते सर्व करु’, भाजपचे प्रसाद लाड राज ठाकरेंच्या भेटीला

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.