AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2022 Pali Hill Ward 100 : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांचं सर्वस्व पणाला, खरी लढत शिवसेना आणि भाजपमध्येच

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बैठका, मेळावे आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींवर जोर दिलाय. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसही ठाकरेंना सोबत घेऊन मुंबई महापालिका लढवायची की स्वतंत्र हा विचार करत आपली रणनिती आखताना दिसत आहेत.

BMC Election 2022 Pali Hill Ward 100 : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांचं सर्वस्व पणाला, खरी लढत शिवसेना आणि भाजपमध्येच
| Updated on: Aug 15, 2022 | 10:40 PM
Share

मुंबई : मुंबई महापालिकेवर कमळ फुलवण्यासाठी भाजपनं जोरदार रणनिती आखली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीनंतर शिवसेना अर्ध्याहून अधिक फुटलीय. अशावेळी मुंबई महापालिकेवर असलेली शिवसेनेची सत्ता उलथवून टाकण्यासाठी भाजपनं जोरदार मोहीम हाती घेतलीय. त्याचसाठी भाजपकडून पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी आशिष शेलार (Ashish Shelar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर आमदार, खासदार गेले असले तरी सच्चा शिवसैनिक अजूनही ठाकरेंसोबतच असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येतोय. त्यामुळे मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) ताब्यात घेण्यात भाजपला यश येणार नाही, असा दावा ठाकरे गटातील नेते करत आहेत. मात्र, एकनाथ शिंदे यांच्यासोबत मुंबईतील काही आमदारही गेले असल्यानं ठाकरेंना त्याचा मोठा फटका मुंबई महापालिका निवडणुकीत बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बैठका, मेळावे आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींवर जोर दिलाय. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसही ठाकरेंना सोबत घेऊन मुंबई महापालिका लढवायची की स्वतंत्र हा विचार करत आपली रणनिती आखताना दिसत आहेत. अशावेळी मुंबई महापालिकेतील प्रभाग क्रमांक 100 पाली हिलमध्ये कोणत्या पक्षाचे उमेदवार बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

प्रभाग क्रमांक 100 ची लोकसंख्या :

2011 च्या जनगणनेनुसार मुंबई महापालिकेतील प्रभाग क्रमांक 100 मधील एकूण लोकसंख्या 54 हजार 224 इतकी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 1 हजार 884, तर अनुसूचित जातीची लोकसंख्या 715 इतकी आहे.

मागील निवडणुकीतील विजयी उमेदवार :

2017 मधील मुंबई महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 100 मधून भारतीय जनता पार्टीच्या स्वप्ना विरेंद्र म्हात्रे या विजयी झाल्या होत्या. त्यांना एकूण 9 हजार 717 मतं मिळाली होती. तर त्यांच्यानंत काँग्रेसच्या कॅरन सिसीलिया डिमेलो आणि शिवसेनेच्या ब्रिनेल जॉर्ज फर्नांडिस या अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहिल्या.

प्रभाग क्रमांक 100 च्या सीमा :

उत्तरेला एच/पश्चिम व के/पश्चिम विभागाची सामाईक नाला, पूर्वेला के/पू व एच/पू विभागाची सामाईक सीमा व पश्चिम रेल्वे लाईन्स. दक्षिणेला प्रभाग क्रमांक 101 सरस्वती रोड, तर पश्चिमेला एच/पश्चिम व के/पश्चिम विभागाची सामाईक नाला.

प्रभाग क्रमांक 100 ची व्याप्ती :

डॉ. वसंतराव अवसरे मार्ग (‘एच/पश्चिम’ व ‘के/पश्चिम’ विभागांची सामाईक सीमा) व पश्चिम रेल्वे लाईन्स (मिलन सब वे) च्या नाक्यापासून पश्चिम रेल्वे लाईन्सच्या पश्चिमबाजूने दक्षिणेकडे कनू देसाई रोड (स्टेशन रोड) पर्यंत. तेथून कनू देसाई रोडच्या उत्तरबाजूने पश्चिमेकडे एस.व्ही. रोडपर्यंत. तेथून एस. व्ही. रोडच्या पूर्वबाजूने उत्तरेकडे सरस्वती रोडपर्यंत. तेथून सरस्वती रोडच्या उत्तरबाजूने पश्चिमेकडे लिंक रोडपर्यंत. तेथून लिंक रोडच्या पूर्वबाजूने उत्तरेकडे जुहू रोडपर्यंत. तेथून जुहूरोडच्या उत्तरबाजूने पश्चिमेकडे ‘एच/पश्चिम’ व ‘के/पश्चिम’ विभागांच्या सामाईक सीमे (नाला) पर्यंत. तेथून उक्त सामाईक सीमेच्या पूर्वबाजूने उत्तरेकडे (नाल्याने) व पुढे दक्षिणबाजूने पूर्वेकडे (नाल्याने) व पुढे पूर्वबाजूने उत्तरेकडे व पुढे दक्षिणबाजूने पूर्वेकडे एस. व्ही. रोडपर्यंत. तेथून एस.व्ही.रोडच्या पश्चिम बाजूने दक्षिणेकडे डॉ. वसंतराव अवसरे मार्गापर्यंत. तेथून डॉ. वसंतराव अवसरे मार्गाच्या दक्षिण बाजूने पूर्वेकडे पश्चिम रेल्वे लाईन्सपर्यंत म्हणजेच निघालेल्या ठिकाणापर्यंत. सदर प्रभागात खीरा नगर, बजाज वाडी, सांताक्रुझ बस डेपो या प्रमुख ठिकाणे / वस्ती /नगरे यांचा समावेश होतो.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.