AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bypoll 2022 : लिटमस टेस्टमध्ये कोण झाले पास ? 6 राज्यातील पोटनिवडणुकीतील 7 जागांवर कोणी मारली बाजी?

Bypoll 2022 : देशातील 6 राज्यात पोटनिवडणुका झाल्यात, यात कोणत्या पक्षाने बाजी मारली ते पाहुयात..

Bypoll 2022 : लिटमस टेस्टमध्ये कोण झाले पास ? 6 राज्यातील पोटनिवडणुकीतील 7 जागांवर कोणी मारली बाजी?
कोणी मारली बाजी?Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Nov 06, 2022 | 5:58 PM
Share

नवी दिल्ली : देशातील 6 राज्यात पोटनिवडणूक (Bypoll) झाली. 7 जागांसाठी (Seats) मतदान (Voting) झाले. या पोटनिवडणुकीतील निकाल (Result)आता हाती आले आहेत. यामध्ये कोणत्या पक्षाने सर्वाधिक जागा खेचून आणल्या हा औत्सुक्याचा विषय ठरला आहे. भाजपला (BJP) काही ठिकाणी प्रादेशिक पक्षांनी (State Parties) जेरीस आणले याचीही चर्चा रंगली आहे..

तर या पोटनिवडणुकीत भाजपने अपेक्षेप्रमाणे चार जागा खिशात घातल्या आहेत. तर इतर काही ठिकाणी प्रादेशिक पक्षांनी भाजपला आव्हान दिले आहे. यामध्ये एक जागा शिवसेना-ठाकरे गट तर दुसरी जागा राजदने जिंकली आहे.

तेलंगणा राज्यातील मुनुगोडे जागेवरुन भाजप आणि टीआरएसमध्ये जोरदार लढत पहायला मिळत आहे. दोघांनी या जागेसाठी बळ लावले आहे. सध्याच्या घडीला टीआरएसने आघाडी कायम ठेवली आहे. गेल्या अनेक फेऱ्यात टीआरएसचा उमेदवार आघाडीवर आहे.

देशात बिहारमधील मोकामा, गोपाळगंज, महाराष्ट्रातील अंधेरी पूर्व, तेलंगाणातील मुनुगोडे, उत्तरप्रदेशातील गोला गोकर्णनाथ, ओडिशातील धामनगर, हरियाणातील आदमपूर या सात विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक झाली होती.

तेलंगाणा वगळता इतर ठिकाणचे चित्र अगदी स्पष्ट झाले आहे. बिहारमध्ये राजदच्या नीलम देवी यांनी भाजपच्या सोनम देवी यांचा पराभव करत, भाजपला नवीन ‘महागठबंधन’ची चुणूक दाखवली.

तर गोपाळगंजच्या जागेवर भाजपच्या कुसुम देवी यांनी राजदच्या मोहन प्रसाद गुप्ता यांना हरवत महाआघाडीला धक्का दिला. त्यामुळे बिहारमधील येत्या काही दिवसात सत्तासंघर्ष तीव्र होईल, हे दिसून येते.

महाराष्ट्रातील अंधेरी पूर्व जागेवर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांनी बाजी मारली. या निवडणुकीत भाजपसह शिंदे गटाने उमेदवार दिला नव्हता. पण या निवडणुकीत ‘नोटा’ला 12,806 मते मिळाल्याने चर्चा सुरु झाली आहे. लटके यांना एकूण 66,530 मते मिळाली.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी, ओडिशातील धामनगर, हरियाणातील आदमपूर तर गोपाळगंज या जागेवर भाजपच्या उमेदवारांनी विजयश्री खेचून आणला.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.