AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मैं अटल हूँ’ करमुक्त करा, कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

अटलबिहारी वाजपेयींसारख्या भारतमातेच्या सच्च्या सुपूत्राचे दर्शन सर्व सामान्यांना घडावे. या थोर नेत्याच्या जीवनाचा समग्र वेध प्रत्येकाला घेता यावा यासाठी "मैं अटल हूँ" हा चित्रपट करमुक्त होणे आवश्यक आहे. यासाठी कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हा चित्रपट करमुक्त व्हावा अशी मागणी केली आहे.

'मैं अटल हूँ' करमुक्त करा, कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
mangalprabhat lodha Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jan 25, 2024 | 7:29 PM
Share

मुंबई | 25 जानेवारी 2024 : देशाचे माजी पंतप्रधान कवी मनाचे नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘मैं अटल हूँ’ नुकताच मुंबईसह देशभर प्रदर्शित झाला आहे. भाजपाचे नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारख्या बहुआयामी व्यक्तीमत्व लाभलेल्या थोर नेत्याच्या जीवनाचा प्रवास तरुण पिढीला पाहाता यावा यासाठी हा चित्रपट करमुक्त करण्यात यावा अशी मागणी कॅबिनेट मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्र पाठवून केली आहे.

भारताचे माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित ‘मैं अटल हूँ’ चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट तरुणांनी विशेषत: शालेय विद्यार्थ्यांना पाहाता यावा यासाठी त्यास करमुक्त करण्यात यावे अशी मागणी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून केली आहे. या चित्रपटात हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेती पंकज त्रिपाटी यांनी अभिनय केलेला आहे. या चित्रपटात अणू चाचणी करुन भारताला सर्मथ राष्ट्रांच्या पंक्तीत बसविणारे अटलबिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तीमत्वाचे अनेक कांगोरे चित्रीत करण्यात आले आहेत. या चित्रपटाला जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी त्या कर मुक्त करण्यात यावे असे मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविल्या पत्राचा आशय आहे.

प्रत्येकाने चित्रपट पहावा

वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित ‘मैं अटल हूँ’ हा चित्रपट अनेकांना प्रेरणादायी ठरणारा आहे. स्व. अटलजी यांचे विचार सर्वदूर पोहचण्यासाठी हा चित्रपट अधिकाधिक जनतेला पाहाता यावा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सर्वसामान्यांना चित्रपट माफक दरात पाहता यावा याकरिता ‘मैं अटल हूँ’ महाराष्ट्रात करमुक्त व्हावा अशी आपली आग्रही मागणी असल्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पत्रात म्हटले आहे. प्रत्येकाने हा चित्रपट आवर्जून पाहिला पाहिजे. एका प्रतिभावंत नेत्याचा जीवनप्रवास सर्वांना मार्गदर्शक ठरेल असे कॅबिनेट मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.