व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर खैरे, भूमरे आमने-सामने; खैरे म्हणतात मिळालेल्या खोक्यातून पैशांचं वाटप, तर भूमरेंच खैरेंना थेट आव्हान
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची पैठणमध्ये सभा होणार आहे. मात्र ही सभा व्हयरल ऑडीओ क्लिपमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

औरंगाबाद : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची पैठणमध्ये सभा होणार आहे. मात्र ही सभा अनेक गोष्टींमुळे चर्चेत आली आहे. सुरुवातीला या सभेसंदर्भात एक पत्र व्हायरलं झालं होतं. तालुक्यातील अंगणवाडी सेविकांना सभेसाठी उपस्थित राहण्याचे आदेश या पत्राद्वारे देण्यात आले होते. मात्र हे पत्र बनावट असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या सभेला पैसे देऊन लोकं जमावले असल्याची एक ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. या व्हायरल क्लिपवरून शिवसेना (Shiv sena) नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. मिळालेल्या पैशांमधून सभेसाठी पैशांचं वाटप सुरू असल्याचा टोला खैरे यांनी लगावला आहे.
खैरे, भुमरे आमने-सामने
आज पैठणमध्ये एकनाथ शिंदे यांची सभा आहे. मात्र या सभेपूर्वीच पैसे वाटून सभेला गर्दी जमावल्याची एक ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपने सर्वत्र गोंधळ उडाला आहे. टीव्ही 9 मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. मात्र या क्लिपवरून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि आमदार संदीपान भुमरे आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे.
मिळालेल्या पैशांमधून सभेला गर्दी जमावण्यासाठी पैसे वाटल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. चंद्रकांत खैरे यांच्या या आरोपानंतर संदीपान भुमरे देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत. पैसे वाटल्याचं दाखवून द्यावं असं थेट आव्हानच संदीपान भूमरे यांनी केलं आहे.
व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय?
मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी एक ऑडिओ क्लिप व्हयरलं झाली आहे. या क्लिपमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेला पैसे देऊन गर्दी जमवल्याचं ऑडीओ संभाषण आहे. गर्दी जमवण्यासाठी प्रत्येकी 250 रुपये देण्यात आल्याचं हे संभाषण आहे. या क्लिपमुळे खळबळ उडाली आहे.
