AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrakant Patil : कशाला ईडी पाहिजे मीच स्वतः ईडीकडे जातो, शरद पवारांच्या वक्तव्याचा चंद्रकांत पाटील यांनी घेतला खरपूस समाचार

आज राहूल गांधी यांना ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते आहे. दिल्ली पोलिसांनी ईडीच्या कार्यालय परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्याला आहे.

Chandrakant Patil : कशाला ईडी पाहिजे मीच स्वतः ईडीकडे जातो, शरद पवारांच्या वक्तव्याचा चंद्रकांत पाटील यांनी घेतला खरपूस समाचार
शरद पवारांच्या वक्तव्याचा चंद्रकांत पाटील यांनी घेतला खरपूस समाचार Image Credit source: twitter
| Updated on: Jun 13, 2022 | 12:57 PM
Share

मुंबई – माणसाने कोणत्याही गोष्टीचं टेन्शन न घेता काम करत राहिलं पाहिजे. विधानपरिषद बिनविरोध निवडणूक करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद आला तर प्रयत्न करणार आहे. राज्यसभेला आलेला अनुभव पाहता महाविकास आघाडी (MVA) योग्य निर्णय घेईल अशी आम्हाला आशा आहे. माझा आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा फोन कायम सुरू आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तपास करणाऱ्या यंत्रणांवर दबाव आणायचं काम सुरू झालं आहे. कारवाई केली तर घेराव घालणार का तुम्ही, हे चुकीचं आहे. तीन वर्षांपूर्वी एका नेत्याला ईडीची नोटीस आली त्यावेळी हजारोच्या संख्येनं आंदोलन केलं होतं. कशाला ईडी पाहिजे मीच स्वतः ईडीकडे जातो म्हणत हजारो नागरिक गोळा केले. या सगळ्याचा ईडीवर काही परिणाम होणार नाही असं म्हणत चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शरद पवारांना टोला लगावला.

राहूल गांधी यांना ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावलं आहे

आज राहूल गांधी यांना ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते आहे. दिल्ली पोलिसांनी ईडीच्या कार्यालय परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्याला आहे. त्याचबरोबर राहूल गांधी यांना ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावल्याने देशात अनेक ठिकाणी कॉंग्रेसकडून आंदोलन कऱण्यात येत आहे. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांवरती दबाव आणला जात असल्याचं म्हटलं आहे. देशात अनेक ठिकाणी ईडी कारवाई करीत आहे. त्याला विरोध करण्याचं प्रमाण वाढलं आहे. महाराष्ट्रात देखील नागपूर आणि मुंबई कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलनाला सुरूवात केली आहे.

मोदी कायम नेहरू गांधी परिवाराला टर्गेट करत आहे

2014 पासून अत्याचारी भाजप सरकार आले या विरोधात आमची लढाई सुरू आहे. गांधी परिवारने देशाला घडवलं सर्व सामान्य माणूस हा गांधी परिवारा सोबत आहे. चौकशी डाकु आणि चोरांची केली जाते, हे गांधी परिवाराची चौकशी करत आहेत. मोदी सरकार आल्यावर बोफोर्स प्रकरणात राजीव गांधी निर्दोष आहेत असे म्हंटले. मोदी कायम नेहरू गांधी परिवाराला टर्गेट करत आहे. हा आम्हाला बदनाम करण्याचा भाजपचा धंदा आहे. ही भ्याड कारवाई आहे. आमच्या जवळ मतं जास्त आहे भाजपकडे पुरेसे मत नाही कॉंग्रेसची भूमिका ही विधानपरिषद निवडणुका बिनविरोध करण्यासाठीची आहे.

भाजपने उगाच वेगळी खेळी करू नये असा सल्ला नाना पटोले यांनी भाजपला दिला.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.