AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन जळगावात, एकनाथ खडसे कन्या-सूनेसह उशिरा दाखल

चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन एकनाथ खडसे यांची समजूत घालण्यासाठी जळगावात गेले, मात्र खडसेंनीच बैठकीला येण्यास उशीर केला

चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन जळगावात, एकनाथ खडसे कन्या-सूनेसह उशिरा दाखल
| Updated on: Dec 07, 2019 | 3:41 PM
Share

जळगाव : भाजपने पक्षातील नाराज नेत्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु केल्याचं दिसत आहे. भाजपच्या विभागीय कोअर कमिटीच्या बैठकीच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि संकटमोचक नेते गिरीश महाजन भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची समजूत घालण्यासाठी जळगावात गेले, मात्र खडसेंनीच बैठकीला (BJP Jalgaon Meeting) येण्यास बराच उशीर केला. दुपारी साडेतीनच्या सुमारास ते कन्या रोहिणी खडसे आणि सून रक्षा खडसे यांच्यासह हजर झाले.

पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांना पक्षातील नेत्यांनीच पाडलं, असा आरोप एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्याला उत्तर देताना, भाजपमधील पाडापाडी करणाऱ्या नेत्यांची नावं जाहीर कराच, असं खुलं चॅलेंज गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना दिलं होतं. त्यामुळे खडसे काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांच्या विभागवार बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. गिरीश महाजन यांनी दिलेल्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर महाजन आणि खडसे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलिस संरक्षणात बैठका होत आहेत. पक्षांतर्गत वाद झाल्यास ते बाहेर फुटू नयेत, म्हणून बंद दाराआड चर्चा करण्यात आली. परंतु एकनाथ खडसे यांनी बैठक स्थळी हजेरी लावण्यास दुपार केली.

गिरीश महाजन काय म्हणाले?

‘विधानसभा निवडणुकीत रोहिणी खडसे यांना पाडणाऱ्यांची नावं एकनाथ खडसे यांनी पक्षश्रेष्ठींकडे दिल्याचं ते सांगत आहेत. त्यांनी ती नावं गुप्त न ठेवता पुराव्यानिशी थेट जाहीर करावीत’, असं चॅलेंज गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना दिलं होतं.

…म्हणून रोहिणी खडसेंचा पराभव, गिरीश महाजन यांनी पहिल्यांदाच कारण सांगितलं!

‘कुणीच कुणाला पाडत नसतं. त्यांना अपयश आलं, याचं आम्हालाही वाईट वाटतं. मुक्ताईनगर मतदार संघातून खडसे हे यापूर्वीही अ‍ॅड. रवींद्र पाटील यांच्याविरोधात 1200 मतांच्या फरकाने आणि मागील निवडणुकीत प्रचंड मोठी मोदी लाट असतानाही केवळ 8500 मतांनी निवडून आले आहेत’, असंही महाजन म्हणाले होते.

नाराज आपोआपच एकत्र येतात, खडसेंचे 10 रोखठोक मुद्दे

‘यावेळी तिथे अटीतटीचा सामना होता. त्यातच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आले होते. त्यामुळेच दीड-दोन हजार मतांचा फरक पडला’, असा अंदाज महाजनांनी (BJP Jalgaon Meeting) वर्तवला होता.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.