भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पंकजा मुंडेंच्या भेटीला, मुंडेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न?

| Updated on: Jul 21, 2021 | 10:35 PM

ओबीसी आरक्षणाच्या बैठकीतही पंकजा मुंडे गैरहजर राहिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पंकजा मुंडे यांची भेट घेतली. वरळीतील गोपीनाथ मुंजे प्रतिष्ठानच्या कार्यालयात मंगळवारी संध्याकाळी ही भेट झाली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पंकजा मुंडेंच्या भेटीला, मुंडेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न?
चंद्रकांत पाटील यांनी घेतली पंकजा मुंडे यांची भेट
Follow us on

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडे यांची नाराजी प्रकर्षाने समोर आली होती. त्यानंतर आपल्या समर्थकांशी संवाद साधताना पंकजा मुंडे यांनी भावनिक आवाहन करत राजीनामे परत घेण्यास सांगितलं होतं. त्यानंतर भाजपने आयोजित केलेल्या ओबीसी आरक्षणाच्या बैठकीतही पंकजा मुंडे गैरहजर राहिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पंकजा मुंडे यांची भेट घेतली. वरळीतील गोपीनाथ मुंजे प्रतिष्ठानच्या कार्यालयात मंगळवारी संध्याकाळी ही भेट झाली आहे. (Chandrakant Patil met Pankaja Munde in Worli)

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद न मिळाल्यानं पंकजा मुंडे नाराज असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. तसंच ओबीसी आरक्षणाच्या बैठकीतही त्या गैरहजर होत्या. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतल्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु असल्याचं आता बोललं जात आहे.

‘एकाच पक्षातील दोन नेत्यांची भेट होणं स्वाभाविक’

दरम्यान, एकाच पक्षातील दोन नेत्यांची भेट होणं स्वाभाविक आहे. यात वेगळं असं काहीच नाही. त्याचबरोबर ही भेट गुप्त नाही तर उघडपणे सर्वांसमोर झाली. त्यामुळेच या भेटीचे फोटो कालपासून सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. आम्ही दोघे भेटलो यात बातमी काय? अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर दिली आहे.

पंकजा म्हणाल्या, ‘माझे नेते मोदी-शाहा’

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा झाली. परंतु अखेरीस त्यांना मंत्रीपदाने हुलकावणी दिली. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा होती. त्यात भरीस भर म्हणजे पंकजा मुंडे समर्थकांनी राजीनाम्याचं सत्र सुरु केलं. यानंतर पंकजा मुंडे यांनी दिल्ली वारी देखील केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांची पंकजांनी भेट घेतली. त्यानंतर वरळीत पत्रकार परिषद घेत “माझा नेता नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत. आम्ही कुणाला घाबरत नाही. मी कुणाचा निराधार करत नाही,” असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधल्याची चर्चा होती.

संबंधित बातम्या :

माझा नेता नरेंद्र मोदी आणि अमित शाह, पंकजा मुंडेंचा थेट देवेंद्र फडणवीसांवर निशाणा?

बेडकाने कितीही फुगण्याचा प्रयत्न केला तरी बैल होत नाही, आशिष शेलारांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

Chandrakant Patil met Pankaja Munde in Worli