बेडकाने कितीही फुगण्याचा प्रयत्न केला तरी बैल होत नाही, आशिष शेलारांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

बेडकाने कितीही फुगण्याचा प्रयत्न केला तरी गाय, बैल होत नाही, असं आशिष शेलार म्हणाले. सध्याची अवस्था राज्याचे प्रश्न कोमात आणि स्वबळाची छमछम जोरात, असं टीकास्त्र शेलारांनी ठाकरे सरकारवर सोडलं.

बेडकाने कितीही फुगण्याचा प्रयत्न केला तरी बैल होत नाही, आशिष शेलारांचा संजय राऊतांवर हल्लाबोल
भाजप आमदार आशिष शेलार आणि शिवसेना खासदार संजय राऊत

पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेत (Pimpri Chinchwad Municipal corporation) शिवसेनेचा महापौर होईल असा विश्वास व्यक्त करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी हल्लाबोल केला. बेडकाने कितीही फुगण्याचा प्रयत्न केला तरी गाय, बैल होत नाही, असं आशिष शेलार म्हणाले. सध्याची अवस्था राज्याचे प्रश्न कोमात आणि स्वबळाची छमछम जोरात, असं टीकास्त्र शेलारांनी ठाकरे सरकारवर सोडलं.

पोलिसांकडून राज्यात वसुलीचं काम सुरू आहे. महाविकास आघाडीमधील नेते सकाळी उठले की स्वबळ असे करतात, कोण दिल्लीला जातं, तर कोण बैठक घेत आहेत. महाविकास आघाडीमधील नेते सकाळी उठले की 108 वेळा स्वबळाचा मंत्र जपत आहेत, असा टोला शेलारांनी लगावला.

भूखंडाचे श्रीखंड पार्ट 2 हा धंदा महाविकास आघाडीने सुरू केला आहे. जनतेतून निवडून आलेल्या सदस्याचे अधिकार काढून घ्यायचे, असं म्हणत त्यांनी 12 आमदारांच्या निलंबनवार भाष्य केलं.

फोन टॅपिंगचे पुरावे द्या

फोन टॅपिंगचा कारभार हा केंद्र सरकारचा नाही. असेल तर पुरावा द्यावा, नाही तर गप्प बसावं, अशी ताकीद आशिष शेलार यांनी विरोधकांना दिली.

मुंबईतील रुग्णालयांवर गुन्हे दाखल करावे लागतील

ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाले असल्यास केंद्रावर गुन्हा दाखल करावा असं संजय राऊत म्हणाले. मात्र मुंबईतील रुग्णालयांवर गुन्हा दाखल करावा लागेल राऊत साहेब, मुंबईत अनेक ठिकणी घटना घडल्या आहेत, त्यामुळे त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा लागेल, असं शेलार म्हणाले.

संबंधित बातम्या 

मुंबई पालिकेच्या फ्लड गेट घोटाळ्याची चौकशी करा; आशिष शेलार यांची मागणी

जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शिरलं, भरती नसताना मिठी नदीला पूर आला, मुंबई धोक्याच्या उंबरठ्यावर?; शेलारांची भीती

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI