AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई पालिकेच्या फ्लड गेट घोटाळ्याची चौकशी करा; आशिष शेलार यांची मागणी

मिठी नदीवर फ्लड गेट लावण्याच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या आहेत. त्यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे. (ashish shelar)

मुंबई पालिकेच्या फ्लड गेट घोटाळ्याची चौकशी करा; आशिष शेलार यांची मागणी
ashish shelar
| Edited By: | Updated on: Jul 19, 2021 | 1:30 PM
Share

मुंबई: मिठी नदीवर फ्लड गेट लावण्याच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या आहेत. त्यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे. वरळीतील फ्लड गेट काढण्यात आलेले असताना मिठी नदीवर फ्लड गेट कशासाठी?, इतर ठिकाणी लावलेल्या फ्लड गेटचा काय फायदा झाला? असे सवाल करतानाच मुख्यमंत्र्यांनी या फ्लड गेट घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे. (ashish shelar demand to probe SIT enquiry of bmc’s flood gate scam)

आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत पालिकेवर फ्लड गेट घोटाळ्याचा आरोप करत ही मागणी केली. मिठी नदीवर फ्लड गेट लावण्यात येणार आहे. 185 ठिकाणी हे फ्लड गेट लावणार आहेत. मिठी नदीला फ्लड गेट लावणार आहात तर वरळीचे फ्लड गेट का काढले? इतर ठिकाणी लावलेल्या फ्लड गेटचा काय फायदा झाला? हा पालिकेचा नवा फ्लड गेट फ्रॉड आहे. मुख्यमंत्री संवेदनशीलपणे काम करत असतील. पण पालिकेत काय चाललं आहे? मुख्यमंत्र्यांनी एसआयटी मार्फत या फ्लड गेट घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी शेलार यांनी केली.

नरबळीचा प्रस्ताव आणणार का?

एवढे सगळे अधिकारी असताना मुंबईत दुर्घटना झाल्याच कशा? असा सवाल करतानाच दुर्घटना झाल्यानंतर पालिकेत प्रस्ताव होतो. आता नरबळी घेत्यावर विकासाचे प्रस्ताव करणार आहात का?; असा संतप्त सवाल त्यांनी केला.

फ्लड वॉर्निंग सिस्टिम फक्त कलानगरसाठीच

यावेळी त्यांनी पालिकेच्या फ्लड वॉर्निंग सिस्टिमवरही टीका केली. फ्लड वॉर्निंग सिस्टिम केवळ कलानगरसाठीच आहे. कलानगरला फ्लड वॉर्निंग आणि बाहेर फ्लड बेरिंग. कलानगरात खूप पंप लावले आहेत. शिवसेनेचे हेच धंदे आहेत, अशी टीका त्यांनी केली.

31 बळींना जबाबदार कोण?

राजकारण करायचा मुद्दा नाही. लोककारण करावं लागेल. पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे काल बळी गेले. पालिकेने 112 टक्के नालेसफाईचा दावा केला होता. पण तरीही 31 लोक दगावले. त्याला जबाबदार कोण? ही नालेसफाई नाही. तर हात सफाई आहे. मिठी नदीबाबतही आम्हाला शंका आहे, असं ते म्हणाले. मुंबईतील धोकादायक भिंती, कट्टे, इमारती, डोंगराळ भाग याचं महिन्याभरापूर्वीच सर्वेक्षण करायला हवं होतं. पण पालिकेने हे सर्वेक्षण केलं नाही. पालिका नागरिकांचं ऐकत नाही. नगरसेवकांचं ऐकत नाही. त्यांना जनतेला मृत्यूच्या दारात आणून ठेवायचं आहे. सेनेच्या पालिकेने हे करून ठेवलंय, अशी टीकाही त्यांनी केली. (ashish shelar demand to probe SIT enquiry of bmc’s flood gate scam)

संबंधित बातम्या:

जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शिरलं, भरती नसताना मिठी नदीला पूर आला, मुंबई धोक्याच्या उंबरठ्यावर?; शेलारांची भीती

Mumbai Rains Live Updates | बदलापूर रेल्वे स्थानकात रुळावर पाणी, आता कल्याणपर्यंतच रेल्वे सेवा सुरू

Maharashtra Rain Update : कोकण पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना रेड अ‌ॅलर्ट, कोकणात नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, मुसळधार सुरुच

(ashish shelar demand to probe SIT enquiry of bmc’s flood gate scam)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.