‘उद्धव ठाकरेंनी स्वत:चं हसं करून घेतलं!’, असं चंद्रकांत पाटील का म्हणाले?

चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. काय म्हणालेत? पाहा...

'उद्धव ठाकरेंनी स्वत:चं हसं करून घेतलं!', असं चंद्रकांत पाटील का म्हणाले?
Follow us
| Updated on: Oct 25, 2022 | 11:20 AM

कोल्हापूर : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या औरंगाबाद दौऱ्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर शेतकरी हसले उद्धव ठाकरे मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले आहेत. शेतकऱ्यांना पन्नास हजार का लाख रुपये द्यायला पाहिजे होते तुमच्या काळात असा का निर्णय घेतला नाही, असं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणालेत.

तुमचं सरकार होतं त्यावेळेला शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना अस्वस्थ केलं. शेतकऱ्यांना 25000 मिळाला पाहिजे पण ते मिळालं नाहीत. पण आताच्या सरकारनं शेतकऱ्यावर जे जे संकट आलं त्या त्या वेळेला मदत केली आहे. शेतकऱ्यांना डबल नुकसान भरपाई दिली आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

महायुतीच्या चर्चांवरही चंद्रकांत पाटील बोलते झाले. भाजप, मनसे आणि बाळासाहेबांची शिवसेना यांची महाविकास आघाडी असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. असा प्रस्ताव असेल तर महाराष्ट्रात भाजपचे 13 कोर कमिटीचे सदस्य बसून निर्णय करतात.या विषयासाठी कोर कमिटीची कोणतीही बैठक झालेली नाही. असा कोणताही प्रस्ताव चर्चेला आला नाही, त्यामुळे ज्या प्रस्तावाची चर्चाच नाही. त्या प्रस्तावाबद्दल मी काय बोलणार?, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.

शंभूराज देसाई यांनी शिंदे सरकारबद्दल केलेलं विधान खरंच आहे कारण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस घेत असलेल्या निर्णयाबद्दल सर्वसामान्य माणूस समाधानी होत आहे. पंधरा वर्षेच नाही तर हे सरकार पुढील अनेक वर्ष शिवसेना भाजपचे राहील, असा विश्वास चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलाय.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.