Babri Case | न्यायाचा विजय, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया, पवारांची टिपण्णी कोर्टाचा अवमान

भाजप नेहमीच न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करते. राम जन्मभूमीचे निर्माण आणि आजचा निकाल हे दोन अतिशय महत्वाचे निर्णय आहेत.

Babri Case | न्यायाचा विजय, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया, पवारांची टिपण्णी कोर्टाचा अवमान
Follow us
| Updated on: Sep 30, 2020 | 4:15 PM

मुंबई : बाबरी मशीद विद्ध्वंस प्रकरणात सीबीआयच्या (CBI) विशेष (Chandrakant Patil Reaction On Babri Case) कोर्टाचा निकाल तब्बल 28 वर्षांनी आला आहे. उत्तर प्रदेशातील लखनौमधील विशेष सीबीआय कोर्टाने बाबरी मशीद विद्ध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केलं आहे. बाबरी घटना पूर्वनियोजित नव्हती, ती अचानक घडली, असे मत कोर्टाने मांडले. त्यावर आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी न्यायालयाच्या या निर्णयावर समाधान व्यक्त केलं आहे (Chandrakant Patil Reaction On Babri Case).

“राम जन्मभूमीच्या संघर्षात अनेक मोठ्या नेत्यांवर कारण नसताना ठपका ठेवला होता. हा ठपका पुसला गेला. याचा आम्हाला आनंद आहे. हा न्यायाचा विजय आहे”, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी न्यायालयाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केलं.

“भाजप नेहमीच न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करते. राम जन्मभूमीचे निर्माण आणि आजचा निकाल हे दोन अतिशय महत्वाचे निर्णय आहेत. लाखो कारसेवकांच्या मनात शतकानूशतके राग होता तो व्यक्त केला. त्या उत्स्फूर्त भावनेमध्ये बाबरी पडली. या लाखो लोकांवर खटले दाखल करणार का?”, असा सवालही चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला.

पवारांची टिपण्णी न्यायालयाचा अवमान ठरु शकेल – चंद्रकांत पाटील

“पवारांचं वैशिष्ट्य आहे की वोट बँक टिकवण्यासाठी टिपण्णी करतात. त्यांची टिपण्णी न्यायालयाचा अवमान ठरु शकेल. तुम्हाला मिळाला तो न्याय आणि आम्हाला मिळाला की अन्याय. ही नीती चुकीची”, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवर टीका केली.

ओवेसी यांची प्रतिक्रिया चुकीची – चंद्रकांत पाटील

“ओवेसी यांची प्रतिक्रिया चुकीची आहे. उत्स्फूर्त भावनेने व्यक्त झालेल्या लोकांनी हिंसा केली असं म्हणता येणार नाही. हा हिंदूंचा अपमान ठरेल”, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

काँग्रेसला चांगल्या गाईडची गरज – चंद्रकांत पाटील

“कृषी कायद्याची अमंलबजावणी आठवडी बाजाराच्या माध्यमातून आधीच लागू झाली होती. यांचं अज्ञान इतकं आहे की यांना चांगला गाईड देण्याची गरज आहे.” (Chandrakant Patil Reaction On Babri Case)

“या सगळ्यांच्या नेत्या सोनिया गांधी आहेत. ते काँग्रेस शासित प्रदेशात हा कायदा लागू करणार नाही असं म्हणत आहेत. हे किती मोठं अज्ञान आहे. तसे करायचे झाल्यास यांना विधिमंडळात या कायद्याच्या विरोधात कायक्सा बनवून, मंजूर करुन राष्ट्रपतींची सही घ्यावी लागेल. त्यांना हा कायदा त्यांना लागू करावाच लागेल”, असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

संजय राऊत मला इतकं महत्त्व का देत आहेत कळत नाही – चंद्रकांत पाटील

“संजय राऊत यांची मराठी आणि इंग्लिशची शिकवणी घेतली पाहिजे. त्यांना हरामखोर आणि नॉटी एकच वाटतं. तसेच one fine morning चा अर्थ त्यांना कळला नाही. त्याचा अर्थ पहाट नसून अचानक असा होतो, हे त्यांना सांगायला हवं. मागच्या सहा महिन्यात माझ्यावर 10 अग्रलेख सामनाने लिहले. का एवढं महत्व देत आहेत कळत नाही”, असं म्हणत  त्यांनी संजय राऊतांवर खोचक टीकाही केली.

पवारांनी मराठा समाजाची दिशाभूल करु नये – चंद्रकांत पाटील

“ओबीसींना मिळणारं कमी असेल तर त्यांनी तसं सांगावं. मराठा आरक्षण आंदोलन सरकारला हाताळत येत नाही, म्हणून वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. शरद पवारांना अज्ञान आहे, असं म्हणता येणार नाही, पण ते त्यांचा विषय दुसरीकडे ढकलत आहेत”, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी महाराजांबद्दलच्या पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. पवारांनी मराठा समाजाची दिशाभूल करु नये, असंही ते म्हणाले.

हाथरस बलात्कार प्रकरणा न्यायासाठी भाजप कार्यकर्तेही आक्रमक – चंद्रकांत पाटील

“उत्तर प्रदेशचे भाजप कार्यकर्ते या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी आक्रमक आहे. आमची आतली आणि बाहेरची भूमिका वेगळी नसते”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी हाथरस बलात्कार प्रकरणावर दिली.

Chandrakant Patil Reaction On Babri Case

संबंधित बातम्या :

Babri Verdict | 28 वर्षांच्या बाबरी खटला निकालानंतर निवृत्त, न्यायमूर्ती सुरेंद्र कुमार यादव यांची कारकीर्द

Non Stop LIVE Update
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.