खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी आटापिटा, बाळासाहेबांच्या नावाने अजून किती दिवस पोळ्या भाजणार? : चंद्रकांत पाटील

"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने अजून किती दिवस पोळ्या भाजणार?", असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी केला (Chandrakant Patil slams Uddhav Thackeray).

खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी आटापिटा, बाळासाहेबांच्या नावाने अजून किती दिवस पोळ्या भाजणार? : चंद्रकांत पाटील


मुंबई :शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने अजून किती दिवस पोळ्या भाजणार? खुर्चीसाठी त्यांनी दिलेल्या हिंदुत्वाच्या शिकवणीचे पालन करणं तुम्ही विसरला आहात”, असं प्रत्युत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (25 ऑक्टोबर) दसरा मेळाव्यात भाजपवर सडकून टीका केली. या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी फेसबुकवर सडेतोड उत्तर दिलं आहे (Chandrakant Patil slams Uddhav Thackeray).

“काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात देशाच्या सर्वोच्चपदी असणाऱ्या लोकांबद्दल अगदी अर्वाच्य भाषेचा उपयोग केला. तुम्ही राज्यप्रमुख आहात, याचा कदाचित तुम्हाला विसर पडला असल्याची प्रचिती काल आली. तुम्ही काल भाषणात पुन्हा एकदा तुमच्या तथाकथित हिंदुत्वाच्या नावाने गाजावाजा केला. मात्र, सत्तेच्या लालसेपोटी सोयीनुसार तुम्ही हिंदुत्वाची व्याख्या बदलत आहात, हे प्रकर्षणाने जाणवत आहे”, असा घणाघात चंद्रकांत पाटलांनी केला.

“ज्यांच्या स्मारकाठिकाणी तुमचा कालचा कार्यक्रम चालला होता, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हिंदुत्वदेखील तुमच्या पचनी पडले नाही. संरसंघचालक मोहन भागवत यांच्याच मार्गाने आम्ही चालत आहोत. सरसंघचालकांनी कालच्या भाषणात एक वक्तव्य केलं, ‘हिंदू, हिंदुत्व, हिंदुराष्ट्र इसको लेकर भ्रम पैदा करने वाले लोग है’, हे मुळात तुमच्यासाठी होतं. हिंदुत्वाचा वापर करुन आपली खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी तुमचा हा सगळा आटापिटा सुरु आहे. तुमच्याकडून आम्हाला हिंदुत्व शिकून घेण्याची गरज नाही. कारण x असतं”, असं उत्तप चंद्रकांत पाटील यांनी दिलं.

“मी कुटुंबप्रमुख आहे, असं काल तुम्ही म्हणालात. याशिवाय काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी दौऱ्यावेळी हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, असं वक्तव्य तुम्ही केलं होतं. मग जे कुटुंब बळीराजाच्या जीवावर चालतं त्यांच्यावर एकही शब्द न बोलता काल जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या सद्यपरिस्थितीचा उल्लेख करणं टाळलं”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले (Chandrakant Patil slams Uddhav Thackeray).

“राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवरही चिडीचूप बसलात. केवळ आपलेच ढोल बडविण्यात तुम्ही समाधान मानलं. एकंदरीत कालचं मुख्यमंत्र्यांचं भाषण हे अभ्यासशून्य आणि सूड भावनेने प्रेरित होते. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, 11 कोटींचं कुटुंब तुम्हाला सांभाळायचं आहे. केवळ भाषणबाजी करुन काहीही होणार नाही”, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI