‘ते निम्मे डॉक्टर, त्यांनी माझी मानसिकता तपासावी, मी त्यांचं डोकं तपासतो’, चंदक्रांत पाटलांचा राऊतांवर पलटवार

| Updated on: Nov 20, 2021 | 3:57 PM

चंद्रकात पाटील यांनी शेतकऱ्यांच्या आयुष्यात सूख आणि समृद्धी आणणारे तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाईलाजाने आणि दुःखाने घेतला. पण त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होणार आहे, अशी खंत व्यक्त केली. त्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पाटलांना टोला लगावला. आता पाटलांनीही राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

ते निम्मे डॉक्टर, त्यांनी माझी मानसिकता तपासावी, मी त्यांचं डोकं तपासतो, चंदक्रांत पाटलांचा राऊतांवर पलटवार
संजय राऊत, चंद्रकांत पाटील
Follow us on

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर विरोधी पक्षाकडून एकप्रकारे आनंदोत्सव साजरा होतोय. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका-टिप्पणीही सुरु आहे. दरम्यान, चंद्रकात पाटील यांनी शेतकऱ्यांच्या आयुष्यात सूख आणि समृद्धी आणणारे तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाईलाजाने आणि दुःखाने घेतला. पण त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होणार आहे, अशी खंत व्यक्त केली. त्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पाटलांना टोला लगावला. आता पाटलांनीही राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. (Chandrakant Patil’s reply to Sanjay Raut’s criticism)

माझा शोक संदेश चंद्रकांत पाटील यांना पाठवेल. त्यांच्यासाठी हा शोक असेल तर त्यासाठी आपण शोकसभा घेऊ. देश उत्सव साजरा करत असेल तेव्हा जर कुणाला शोक वाटत असेल तर त्यांची मानसिकता तपासावी लागेल, अशा शब्दात संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. त्यावर बोलताना ते निम्मे डॉक्टर आहेत. मी त्यांच्याकडेच आता जातो. अलीकडे ते आणि नवाब मलिक काहीही बोलतात. त्यांनी माझी मानसिकता तपासावी आणि मी त्यांचं डोकं तपासतो. त्यांची स्मृती कमी आहे. काँग्रेसनं एक कायदा तीन वेळा आणला आणि तो तिन्ही वेळेस रद्द करावा लागला, असं प्रत्युत्तर पाटील यांनी दिलं. कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे असूनही ते मला समजावून सांगता आलं नाही. यामुळे मोदींनी दु:ख व्यक्त केलं. विरोधकांनी जे होईल त्याच्या विरोधात बोलायचं असतं, असंही पाटील म्हणाले.

‘फडणवीसांनी परबांना कागद, पेन घेऊन समजावून सांगितलं’

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरुनही चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर टीका केलीय. परवा अनिल परब फडणवीसांकडे आले होते. ताकाला जाऊन भांडं कशाला लपवता. शरदराव रणपिसे यांच्या निधनानं रिक्त झालेली जागा बिनविरोध करावी यासाठी ते आले होते. त्यात देवेंद्र फडणवीस यांनी अनिल परब यांना एखाद्या विद्यार्थ्याला समजावून सांगावं तसं कागद पेन घेऊन समजावून सांगितलं की संप कसा संपवता येईल. पॅसेंजर टॅक्स कमी केल्यास सरकारकडून फक्त 100 कोटी घ्यावे लागतील, असं त्यांना सांगितलं. उद्धव ठाकरे यांच्याशी तुम्ही बोला, आम्हीही बोलतो, असं फडणवीस यांनी सांगितल्याचं पाटील म्हणाले.

‘राऊत दिवसभरात 10 वेळेस बोलतील मला तेवढा वेळ नाही’

मी कंगना रनौत यांचा प्रवक्ता नाही. संजय राऊत दिवसभरात 10 वेळेस बोलतील मला तेवढा वेळ नाही, असा टोलाही राऊतांनी लगावलाय. तर भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यात मंत्री छगन भुजबळ, चंद्रकांत पाटील, संजय राऊत, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर असे अनेक नेते एकत्र आले होते. त्यावेळी चाललेल्या गप्पागोष्टींबद्दल विचारलं असता, आपल्याकडे संस्कृती आहे त्यानुसार मंगलप्रसंगी सगळे एकत्र येतात. अगदी 5 भाऊ असले आणि भांडले तरी ते एकत्र येतात, असं पाटील म्हणाले.

इतर बातम्या :

Video : ‘आधी जोरदार टीका, मग एकाच सोफ्यावर मनमोकळ्या गप्पा’, नाशिकच्या लग्न सोहळ्यातील खास राजकीय चित्र

‘बैल कितीही आडमुठा असला तरी शेतकरी आपलं शेत नांगरतोच’, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना जोरदार टोला

Chandrakant Patil’s reply to Sanjay Raut’s criticism