AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : ‘आधी जोरदार टीका, मग एकाच सोफ्यावर मनमोकळ्या गप्पा’, नाशिकच्या लग्न सोहळ्यातील खास राजकीय चित्र

शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातही कधी भ्रष्टाचाराचे आरोप, कधी वैयक्तिक टीका पाहायला मिळाली. दुसरीकडे भुजबळ आणि राऊतांमध्येही खडाजंगी पाहायला मिळाली होती. मात्र, आज या तिन्ही नेत्यांमध्ये मनमोकळ्या गप्पाही दिसून आल्या. निमित्त होतं भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याचं.

Video : 'आधी जोरदार टीका, मग एकाच सोफ्यावर मनमोकळ्या गप्पा', नाशिकच्या लग्न सोहळ्यातील खास राजकीय चित्र
चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ, संजय राऊत
| Edited By: | Updated on: Nov 20, 2021 | 3:16 PM
Share

नाशिक : राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, एकमेकांवर टीका-टिप्पणी असं चित्र आपल्याला राज्यात नेहमी पाहायला मिळतं. मात्र, राजकारणापलिकडे जात वेगवेगल्या पक्षातील लोक आपलै व्यक्तिगत संबंध जोपासतानाही दिसून येतात. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातही कधी भ्रष्टाचाराचे आरोप, कधी वैयक्तिक टीका पाहायला मिळाली. दुसरीकडे भुजबळ आणि राऊतांमध्येही खडाजंगी पाहायला मिळाली होती. मात्र, आज या तिन्ही नेत्यांमध्ये मनमोकळ्या गप्पाही दिसून आल्या. निमित्त होतं भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याचं. (Dialogue between Sanjay Raut, Chandrakant Patil, Chhagan Bhujbal, Devendra Fadnavis)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. त्यावरुन खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि मोदींवर जोरदार टोलेबाजी केली. तर चंद्रकात पाटील यांनी यांनी शेतकऱ्यांच्या आयुष्यात सूख आणि समृद्धी आणणारे तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाईलाजाने आणि दुःखाने घेतला. पण त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होणार आहे, अशी खंत व्यक्त केली. त्यावरुनही संजय राऊत यांनी आज चंद्रकांत पाटलांवर खोचक टीका केली. माझा शोक संदेश चंद्रकांत पाटील यांना पाठवेल. त्यांच्यासाठी हा शोक असेल तर त्यासाठी आपण शोकसभा घेऊ. देश उत्सव साजरा करत असेल तेव्हा जर कुणाला शोक वाटत असेल तर त्यांची मानसिकता तपासावी लागेल, अशा शब्दात संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.

दुसरीकडे राऊत यांनी मागील दौऱ्यात नांदगावमध्ये असताना छगन भुजबळ यांना अंगावर घेण्याची भाषा केली होती. भुजबळांनीही राऊतांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये खटके उडत असल्याचं चित्रही पाहायला मिळालं होतं.

राऊत, भुजबळ आणि पाटलांमध्ये मनमोकळ्या गप्पा

या टीका-टिप्पणीनंतर आज संजय राऊत, छगन भुजबळ आणि चंद्रकांत पाटील एकाच सोफ्यावर बसून गप्पा मारताना दिसले. भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या मुलीचा विवाह सोहळा आज पार पडला. या सोहळ्याला छगन भुजबळ, चंद्रकांत पाटील, संजय राऊत यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित राहिले. यावेळी भुजबळ, पाटील आणि राऊत एकाच सोफ्यावर बसलेले पाहायला मिळाले. एका बाजूला पाटील, दुसऱ्या बाजूला राऊत आणि मधे भुजबळ बसले होते. यावेळी या तिन्ही नेत्यांमध्ये मनमोकळ्या गप्पा झाल्या.

फडणवीस आणि राऊतांमध्येही हस्तांदोलन

पाटील, भुजबळ आणि राऊतांमध्ये मनमोकळ्या गप्पा सुरु असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरही लग्न सोहळ्यात दाखल झाले. त्यावेळी राऊत यांनी उभे राहत फडणवीसांशी हस्तांदोलन केलं आणि औपचारिक गप्पाही मारल्या. त्यामुळे एकीकडे नेतेमंडळींमध्ये राजकीय वाद आणि आरोप-प्रत्यारोप होत असले तरी हे नेते वैयक्तिक आयुष्यात चांगले संबंध जोपासून असतात, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय.

इतर बातम्या :

‘बैल कितीही आडमुठा असला तरी शेतकरी आपलं शेत नांगरतोच’, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना जोरदार टोला

एसटीच्या महिला कर्मचारी अनिल परबांची साडी-चोळी आणि नारळाने ओटी भरणार! पडळकरांनी सांगितली आंदोलनाची पुढील दिशा

Dialogue between Sanjay Raut, Chandrakant Patil, Chhagan Bhujbal, Devendra Fadnavis

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.