Chandrasekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, विकासकामांसाठी भेटायला आल्याची स्पष्टोक्ती

| Updated on: Jul 29, 2022 | 3:18 PM

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे दिवसातून स्वप्न बघणारे आहेत. सरकार स्थापन झालं. आता हे सरकार विकासकामं जोरात करणार आहेत.

Chandrasekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, विकासकामांसाठी भेटायला आल्याची स्पष्टोक्ती
Follow us on

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट घेतली. त्यांच्यासोबत नागपूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेले शेतीचे, घरांचे नुकसान तसेच विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil), माजी मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) उपस्थित होते. या भेटीबाबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्यातील विकास कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला या ठिकाणी आलो आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये महाराष्ट्राला (Maharashtra) न्याय मिळणार आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार राज्यात भरपूर विकासकाम करणार आहेत. यामुळं महाविकास आघाडीतील नेत्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. अशी भरपूर काम हे नवं सरकार करणार आहे, असंही ते म्हणाले. टीव्ही 9 मराठीशी ते मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर बोलत होते.

विदर्भ वैधानिक मंडळ तयार करायचंय

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे दिवसातून स्वप्न बघणारे आहेत. सरकार स्थापन झालं. आता हे सरकार विकासकामं जोरात करणार आहेत. ओबीसी आरक्षणानेच निवडणूक होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विकासकामांवबाबत बावनकुळे म्हणाले, 1 मिनिटं देखील लागला नाही. 1 मिनिटात सही झाली. महाराष्ट्रातील अनेक विकासकामांचे प्रश्न आहेत. विदर्भ वैधानिक मंडळ तयार करणे, मराठवाडा वैधानिक मंडळ तयार करणे महत्त्वाचे आहे. मागील सरकारने वैधानिक मंडळे बंद केली होती. वैधानिक विकास मंडळं ही विकासकामांचा गाभा आहे. अशी महत्त्वाची कामं सुरू करण्याची मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं. या सरकारमध्ये दोन वर्षात ट्वेंटी-ट्वेंटी मॅच होईल. 20-20 मॅचमध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जे जुने लोक होती त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही, अशा शब्दात बावनकुळे यांनी ठाकरे सरकारचा समाचार घेतला. राज्याचा विकास करायचा असेल, तर मुख्यमंत्र्यांना भेटावं लागतं. राज्याच्या जनतेच्या विकासाची काम करावी लागतात. त्यासाठी ही भेट होती. अशा भेटींमधून विकासाला नवी दिशा मिळते, असंही बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं.

हे सुद्धा वाचा