देशातल्या फक्त 'या' दोन जागा भीम आर्मी लढणार

लखनऊ : आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना तगडे आव्हान देण्यासाठी भीम आर्मी संघटनाही लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशमधील वाराणसी मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. या मतदारसंघात भीम आर्मीही उमेदवार देणार असल्याची माहिती भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आजाद यांनी दिली. नरेंद्र मोदींचा पराभव करण्यासाठी भीम आर्मी मैदानात उतरली आहे. पंतप्रधान नरेंद्र …

देशातल्या फक्त 'या' दोन जागा भीम आर्मी  लढणार

लखनऊ : आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना तगडे आव्हान देण्यासाठी भीम आर्मी संघटनाही लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशमधील वाराणसी मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. या मतदारसंघात भीम आर्मीही उमेदवार देणार असल्याची माहिती भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आजाद यांनी दिली. नरेंद्र मोदींचा पराभव करण्यासाठी भीम आर्मी मैदानात उतरली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या दोघांविरोधात भीम आर्मी आपले उमेदवार उभे करणार आहे.

भीम आर्मीच्या या निर्णयाने सध्या उत्तर प्रदेशमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. चंद्रशेखर आजाद यांची व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चंद्रशेखर आजाद यांनी मोदींच्या विरोधात उमेदवार उभा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच या व्हिडीओमध्ये चंद्रशेखर यांनी समाजवादी पार्टी- बुहजन समाज पार्टी यांच्यात झालेल्या आघाडीवर शंका उपस्थित केली आहे. सपाने आपली भूमिका स्पष्ट करावी. सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी जरी आघाडी केली असली, तरी त्यांचे वडील मुलायम सिंह यादव पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना पाहण्यासाठी इच्छुक आहेत, असं चंद्रशेखर आजाद यांनी आपल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

“या व्हिडीओबद्दल अजून चंद्रशेखर आजाद यांच्याकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. आघाडी करणाऱ्या पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करण्यासाठी मजबूत असे उमेदवार उतरवणे गरजेचे आहे. जर असं झालं नाही, तर भीम आर्मी आपला उमेदवार नरेंद्र मोदींच्या विरोधात मैदानात उतरवेल”, असं भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन यांनी या व्हिडीओबद्दल स्पष्टीकरण देताना सांगितले.

चंद्रशेखर आजाद यांनी व्हिडीओमध्ये मोदींवर निशाणा साधत म्हणाले, पंतप्रधान यांना लोकसभेत न जाण्यासठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. यासाठी आम्ही आमचा उमेदवार मोदींच्या विरोधात निवडणूक मैदानात उतरवणार आहे. तसेच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचाही पराभव करण्यासाठी उमेदावर उतरवणार असल्याचे चंद्रशेखर आजाद यांनी सांगितले.

येत्या 15 मार्चला भीम आर्मीतर्फे दिल्लीमध्ये पार्लियामेंट स्ट्रीटवर हुंकार रॅलीचे आयोजन करण्यात आलं आहे. 15 मार्चला भीम आर्मी पुन्हा एकदा आपली ताकद सर्वांना दाखवेल, असं चंद्रशेखर आजाद म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *