“अजित पवारांशिवाय सरकार होऊ शकत नाही, 30-35 आमदार अस्वस्थ”

राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला निर्णय मागे न घेण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मात्र, तरिही राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरुच आहेत (Chhagan Bhujbal and Ajit Pawar meeting).

अजित पवारांशिवाय सरकार होऊ शकत नाही, 30-35 आमदार अस्वस्थ
Follow us
| Updated on: Nov 25, 2019 | 10:23 AM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला निर्णय मागे न घेण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मात्र, तरिही राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरुच आहेत (Chhagan Bhujbal and Ajit Pawar meeting). राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी देखील आज अजित पवार यांची भेट घेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला (Chhagan Bhujbal and Ajit Pawar meeting). तसेच पक्षातील आमदारांच्या भावना काय आहेत याचीही त्यांना कल्पना दिली.

विशेष म्हणजे छगन भुजबळ यांनी रविवारी (25 नोव्हेंबर) देखील अजित पवारांना फोन करुन त्यांच्याशी चर्चा केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छगन भूजबळ यांनी अजित पवार यांना त्यांच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे 30-35 आमदार अस्वस्थ असल्याची माहिती दिली आहे. तसेच राष्ट्रवादीत परत येण्याचे आवाहनही केले आहे.

अजित पवार यांच्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही, असंही या अस्वस्थ आमदारांचं म्हणणं असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील गुंतागुंत समोर आली आहे. यातून मोठं नुकसान होऊ नये म्हणूनच राष्ट्रवादीकडून अजित पवार यांचं मन वळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न होत आहेत.

दरम्यान, छगन भुजबळ यांनी रविवारी (24 नोव्हेंबर) रात्री अजित पवारांना फोन करून रविवारी भेटायला येत असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आज सकाळी भुजबळ अजित पवारांच्या भेटीला गेले. काही वेळातच जयंत पाटील देखील अजित पवार यांना भेटणार असल्याची माहिती येत आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.