ईडीने फक्त मफलर ठेवली म्हणणाऱ्या भुजबळांची संपत्ती किती?

| Updated on: Oct 04, 2019 | 8:53 PM

भुजबळांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या कारवाईनंतर त्यांची कोट्यवधींची संपत्ती जप्त केली होती. सगळं जप्त केलं, फक्त मफलर ठेवली, पण लोकांचं प्रेम जप्त करु शकले नाही, असं भुजबळ नेहमी सांगतात. पण त्यांच्याकडे सध्याही कोट्यवधींची संपत्ती आहे.

ईडीने फक्त मफलर ठेवली म्हणणाऱ्या भुजबळांची संपत्ती किती?
Follow us on

नाशिक : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal assets) यांनी येवल्यातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी त्यांच्याकडील संपत्तीचाही (Chhagan Bhujbal assets) तपशील प्रतिज्ञापत्रात नमूद केला. भुजबळांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या कारवाईनंतर त्यांची कोट्यवधींची संपत्ती जप्त केली होती. सगळं जप्त केलं, फक्त मफलर ठेवली, पण लोकांचं प्रेम जप्त करु शकले नाही, असं भुजबळ नेहमी सांगतात. पण त्यांच्याकडे सध्याही कोट्यवधींची संपत्ती आहे.

भुजबळांची जंगम मालमत्ता

हातातली रोख रक्कम – 1 लाख 3 हजार 160 (पत्नीकडे – 51700 रुपये)

बँकातील ठेवी – चार बँकांमध्ये अनुक्रमे 12 लाख 66 हजार 56 रुपये, 2 लाख 9 हजार 378 रुपये, 2 लाख 9 हजार 381 रुपये आणि 2 लाख 9 हजार 380 रुपये, बँकेतील ठेवी – 46 लाख 20 हजार 787 (पत्नीकडे – दोन बँकांमध्ये अनुक्रमे – 5 लाख 89 हजार 470, 1 लाख 64 हजार 170)

बाँड्स, शेअर्स – 1 लाख 62 हजार 52 रुपये, पत्नीकडे 25 लाख 25 हजार 100 रुपये

सोने – 21 लाख 6 हजार रुपये

इतर ठेवींसह एकूण जंगम मालमत्ता – 1 कोटी 1 लाख 25 हजार 794 (पत्नी – 1 कोटी 65 लाख 20 हजार 191 रुपये)

स्थावर मालमत्ता

सध्याच्या बाजारमूल्यानुसार विविध प्लॉट, फ्लॅट यासह एकूण मालमत्ता – 10 कोटी 38 लाख 94 हजार 639 रुपये (पत्नीकडे – 13 कोटी 88 लाख 98 हजार 674 रुपये)

एकूण कर्ज – 38 लाख 24 हजार 426 रुपये

ईडी आणि आयकर विभागाकडून भुजबळांच्या मालमत्तेवर टाच

छगन भुजबळ तुरुंगात असताना आयकर विभाग आणि ईडीने त्यांच्या कोट्यवधींच्या संपत्तीवर टाच आणली. 6 डिसेंबर 2017 रोजी ईडीने त्यांची 20 कोटी 41 लाखांची मालमत्ता जप्त केली होती. त्यापूर्वी जप्त केलेल्या रक्कमेसह त्यांची एकूण 178 कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली होती.

याशिवाय आयकर विभागानेही भुजबळांवर मोठी कारवाई केली होती. 5 जुलै 2017 रोजी पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, आयकर विभागाने भुजबळांची 300 कोटींची बेनामी संपत्ती जप्त केली होती.