शरद पवार राष्ट्रपती झाले तर मी आनंदोत्सव साजरा करेन- छगन भुजबळ

"विरोधीपक्षात शरद पवारांना उमेदवारी देण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. त्यांना उमेदवारी मिळाली आणि ते राष्ट्रपतीपदाच्या खुर्चीत विराजमान झाले तर मला आनंद होईल", असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय.

शरद पवार राष्ट्रपती झाले तर मी आनंदोत्सव साजरा करेन- छगन भुजबळ
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 6:15 PM

मुंबई : सध्या देशात राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होत आहे. यासाठी विरोधीपक्षाची मोट बांधणी सुरू आहे. यात शरद पवारांचं नाव आघाडीवर आहे. त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यावर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “विरोधीपक्षात शरद पवारांना (Sharad Pawar) उमेदवारी देण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. त्यांना उमेदवारी मिळाली आणि ते राष्ट्रपतीपदाच्या खुर्चीत विराजमान झाले तर मला आनंद होईल”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय.

भुजबळ काय म्हणाले?

“विरोधीपक्षात शरद पवारांना उमेदवारी देण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. त्यांना उमेदवारी मिळाली आणि ते राष्ट्रपतीपदाच्या खुर्चीत विराजमान झाले तर मला आनंद होईल”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

21 जुलैपर्यंत नव्या राष्ट्रपतींची निवड प्रक्रिया पूर्ण होईल. अश्यात यंदा पवारांनी राष्ट्रपती व्हावं, यासाठी महाराष्ट्र काँग्रेस आग्रही आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी तसं ट्विट केलं आहे. “महाराष्ट्राची व्यक्ती देशाची राष्ट्रपती होत असेल तर याचा मला आनंदच होईल.शरद पवारांकडे राष्ट्रपतीपद येणार असेल तर काँग्रेसचा त्याला पूर्ण पाठिंबा असेल”, असं ट्विट नाना पटोलेंनी केलंय. या ट्विटची सध्या जोरदार चर्चा आहे.

राष्ट्रपतीपद आणि शरद पवार

शरद पवार यांच्या राजकीय सामाजिक वावराला 50 वर्षाहून अधिक काळ पूर्ण झाला. पवारांच्या राजकीय गुगलीची भल्याभल्या राजकीय उस्तादांना उकल होत नाही. पण सगळ्यांना पुरून उरणाऱ्या पवारांना पंतप्रधान आणि राष्ट्रपतीपदाने कायम हुलकावणी दिली आहे. देशाचं घटनात्मक सर्वोच्चपद कायम त्यांच्या नावाच्या भोवती चर्चेत राहिलं. पण त्या खुर्चीत बसण्याचा मान त्यांना मिळाला नाही.

Non Stop LIVE Update
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात.
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस.
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई.
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री.
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट.
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान.
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....