AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भुजबळांनी माझं भाषण त्यांच्या नेत्यांसोबत बसून ऐकावं, संभाजीराजेंचा टोला

महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करू नका," असा सल्ला खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी भुजबळांना दिला. (Chhatrapati Sambhaji Raje Criticism on Chhagan Bhujbal)

भुजबळांनी माझं भाषण त्यांच्या नेत्यांसोबत बसून ऐकावं, संभाजीराजेंचा टोला
| Updated on: Oct 14, 2020 | 11:54 AM
Share

मुंबई : “राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी माझ्या भाषणाचा चुकीचा अर्थ काढला आहे. भुजबळ साहेब आपण अनेक दशकांपासून राजकारणात आहात. तुमच्या जेष्ठत्वाचा आम्ही आदर करतो. पण महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करू नका,” असा सल्ला खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी भुजबळांना दिला. (Chhatrapati Sambhaji Raje Criticism on Chhagan Bhujbal)

खासदार छत्रपती संभाजीराजेंनी याबाबत एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्या पोस्टमध्ये संभाजीराजेंनी संसदेतील भाषणासह इतर मुद्द्यांवर स्पष्टीकरणं दिलं आहे. “मी शिव- शाहूंचा वारस आहे. मी कधीही जातीवाद करत नाही, मराठ्यांना आरक्षण मिळवून देऊन जातीवाद कमी करण्याचाच प्रयत्न करत आहे. त्याला आपल्यासारख्या जेष्ठ राजकारण्यांनी सहकार्य करण्याची गरज आहे,” असा टोलाही संभाजीराजेंनी भुजबळांना लगावला.

संभाजीराजेंची फेसबुक पोस्ट

कोणीतरी दुसऱ्याने पाठवलेला अर्धवट मॅसेज वाचून छगन भुजबळांनी मी संसदेत केलेल्या भाषणावर भाष्य केलं. बी. बी. सी.मराठी वरती त्यांची मुलाखत होती, त्यात त्यांनी माझ्या भाषणाचा चुकीचा अर्थ काढल्याचे दिसून येते. यातून महाराष्ट्राची दिशाभूल होण्याची शक्यता असल्याने आणि माझी वास्तव भूमिका महाराष्ट्राच्या समोर आणण्याकरिता मी ही लिहित आहे.

राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या घटना दुरुस्ती बिलावर मी ते भाषण केलं होतं. ज्यामध्ये मराठा समाजावर कश्याप्रकारे अन्याय झाला? हे मी सिद्ध केलं होतं. आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांनी सर्व बहुजन समाजाला आरक्षण दिलं होतं, त्यात मराठा समाजाचा सुद्धा समावेश होता. 1967 पर्यंत मराठा समाजाचा ओबीसी(इंटर मीडियेट क्लास) च्या राष्ट्रीय यादी (central list) मध्ये समावेश होता आणि अचानक 1968 मध्ये अचानक मराठा जातीला वगळण्यात आले. 1967 मध्ये एका जीआरच्या अनुषंगाने मराठा, माळी आणि तेली या जातींना वगळले होते. त्यानंतर 1968 मध्ये फक्त मराठा समाजाला बाहेर ठेऊन माळी आणि तेली जातींना आत घेतलं गेलं. मी कुणाही जातीच्या विरोधात नाही पण शाहू महाराजांची आरक्षणाची मूळ भावना काय होती? हेच मी बोललो.

एका जबाबदार मंत्री महोदयांकडून मला ही अपेक्षा नव्हती की त्यांनी माझ्या भाषणातील केवळ एक दोन शब्द सुटे काढून, तेही दुसऱ्याने पाठवलेले वाचून मला सल्ला देण्याचा प्रयत्न केला. भुजबळ साहेब आपण अनेक दशकांपासून राजकारणात आहात, तुमच्या जेष्ठत्वाचा आम्ही आदर करतो. पण महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करू नका.

मी जे उदाहरण दिले, जे शब्द वापरले ते, गंगाराम कांबळे यांना राजर्षीं शाहू छत्रपती महाराजांनी हॉटेल काढून दिल्याच्या संदर्भातील होते. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी राजर्षींनी जे केलं, ते देशाला कळावं म्हणून उदाहरण दिलं. आजही देशातील राजकारण्यांनी त्या प्रसंगातून आदर्श घेतला पाहिजे हा माझा शुद्ध हेतू होता.

मी शिव- शाहूंचा वारस आहे. मी कधीही जातीवाद करत नाही, मराठ्यांना आरक्षण मिळवून देऊन जातीवाद कमी करण्याचाच प्रयत्न करत आहे. ज्याला आपल्यासारख्या जेष्ठ राजकारण्यांनी सहकार्य करण्याची गरज आहे, अशी भावना संभाजीराजेंनी या फेसबुक पोस्टमधून व्यक्त केली आहे. (Chhatrapati Sambhaji Raje Criticism on Chhagan Bhujbal)

संबंधित बातम्या : 

खासदार संभाजीराजेंचा मंत्री विजय वड्डेट्टीवारांविषयी खळबळजनक खुलासा, वड्डेट्टीवारांचा घुमजाव

…तर छत्रपतीच्या घराण्याचा वंशज म्हणवून घेणार नाही; संभाजीराजे कडाडले

Follow Us
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...