AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे काम पाहून नायक चित्रपटातील मुख्यमंत्री आठवला; एका दिवसात ST कर्मचाऱ्यांची…

मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून एकनाथ शिंदे यांनी एकापाठोपाठ एक धडाकेबाज निर्णयांचा सपाटा लावला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे काम पाहून नायक चित्रपटातील मुख्यमंत्री आठवला; एका दिवसात ST कर्मचाऱ्यांची...
| Updated on: Oct 04, 2022 | 8:08 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांनी एकापाठोपाठ एक धडाकेबाज निर्णयांचा सपाटा लावला आहे. यामुळे एकनाथ शिंदेचे काम पाहून नायक चित्रपटातील मुख्यमंत्री आठवला आहे. एसटीचे चालक तथा वाहक पदाच्या भरतीमधील उमेदवारांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. यामुळे नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेद्वारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्य परिवहन महामंडळामध्ये 2019 मध्ये चालक तथा वाहक पदासाठी भरती प्रक्रिया राबवली होती. 1431 पात्र उमेदवारांची यापूर्वीच नियुक्ती झाली आहे. मात्र, अनेकजण अद्यापही नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते.

कोरोना महामारीमुळे दोन वर्ष ही भरती प्रक्रिया रखडली होती. मुख्यमंत्र्यांनी पात्र उमेदवारांच्या नेमणूकीला  हिरवा कंदील दाखवला होता. त्यानुसार आज मंत्रालयात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ या भरती प्रक्रियेचा प्रश्न मार्गी लावला आहे. यामुळे  भरतीप्रक्रियेतील पात्र उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या भरतीप्रक्रियेतील पात्र उमेदवारांपैकी 27 पुरूष आणि 22 महिलांना सेवापूर्व प्रशिक्षणाचे पत्र देण्यात आले आहे.

एसटीचे स्टेअरिंग महिलांच्या हातात

महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला होता. त्यानुसार चालक भरती प्रक्रियेत तथा वाहक पदासाठी महिलांकडूनही अर्ज मागवण्यात आले होते.  203 महिला उमेदवार लेखी परिक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्या आहेत.

142 महिला उमेदवारांनी अवजड वाहन चालविण्याचा परवाना सादर केला आहे. यापैकी 22 महिला उमेदवारांना सेवापूर्व प्रक्षिणाचे पत्र देण्यात आले. 80 दिवसांचे सेवापूर्व प्रशिक्षण घेतल्यानंतर या महिला एसटीचे स्टेअरिंग हातात घेणार आहेत.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.