AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हे कसले रक्षक हे तर नराधमांना पाठीशी घालणारे भक्षक’, गृहमंत्र्यांना गुन्हेगारांचं कोंडाळं, चित्रा वाघ भडकल्या

'हे कसले रक्षक हे तर नराधमांना पाठीशी घालणारे भक्षक', अशा शब्दात चित्रा वाघ यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर बोचरी टीका केलीय. | Chitra Wagh Attacked Anil Deshmukh over Viral hoto With Criminal

'हे कसले रक्षक हे तर नराधमांना पाठीशी घालणारे भक्षक', गृहमंत्र्यांना गुन्हेगारांचं कोंडाळं, चित्रा वाघ भडकल्या
Chitra wagh And home Minister Anil Deshmukh
| Updated on: Feb 02, 2021 | 10:12 AM
Share

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याभोवती औरंगाबाद दौऱ्यात गुन्हेगारांचं कोंडाळं असलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. याच फोटोवरुन भाजप नेत्या चित्रा वाघ चांगल्याच भडकल्या आहेत. ‘हे कसले रक्षक हे तर नराधमांना पाठीशी घालणारे भक्षक’, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर बोचरी टीका केलीय. (Chitra Wagh Attacked Anil Deshmukh over Viral hoto With Criminal)

अनिल देशमुख औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात गुन्हेगारांनी पुष्पगुच्छ देऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांचं स्वागत केल्याचं फोटोमध्ये दिसत आहे. कलाम कुरेशी, सय्यद मातीन आणि जफर बिल्डर हे गंभीर गुन्हे असलेले तिघे जण फोटोत पाहायला मिळत आहेत. या फोटोवरुन चित्रा वाघ चांगल्याच भडकल्या. ट्विट करुन त्यांनी गृहमंत्र्यांवरच निशाणा साधला.

बलात्कारी व गुन्हेगारांना “शक्ती” देण्याची मोहीमच जणू गृहमंत्र्यांनी उघडलीये. अन्याय अत्याचारग्रस्त महिलांची भेट घेण्यास त्यांचे सात्वंन करण्यास गृहमंत्र्यांना वेळ नाही पण गुन्हेगारांना बलात्काऱ्यांना बळ देण्यास मात्र तत्पर… ‘हे कसले रक्षक हे तर नराधमांना पाठीशी घालणारे भक्षक’, अशी बोचरी टीका चित्रा वाघ यांनी केलीय.

एक गुटखाकिंग, दुसरा ट्रकचोर, तिसऱ्यावर बलात्काराचा आरोप

गृहमंत्री देशमुखांसोबत फोटो काढलेल्या तिन्ही गुन्हेगारांवर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. गुन्हेगारांपैकी एक गुटखा किंग, तर दुसरा ट्रक चोर आहे तर तिसऱ्या आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे.

कलाम कुरेशी आणि जफर बिल्डर हे एमआयएमचे माजी नगरसेवक आहेत, तर सय्यद मतीनही नगरसेवक पदावर होता. जफर बिल्डर आणि सय्यद मतीन यांनी औरंगाबाद महापालिकेत गोंधळ घालून महापौरांवर खुर्च्या फेकल्या होत्या. सुरक्षारक्षकाला मारहाण केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे.

Aurangabad Anil Deshmukh Criminals Viral Photo 2

Aurangabad Anil Deshmukh Criminals Viral Photo 2

व्हायरल फोटोवरुन गृहमंत्र्यांचं स्पष्टीकरण

चार दिवसांपूर्वी औरंगाबाद दौऱ्यावर होतो. दौऱ्यावर असताना लोकं फोटो काढण्याचा आग्रह धरतात. अशावेळी कोण कुठल्या प्रवृत्तीचा आहे हे कळत नाही. पण यापुढे फोटो काढताना काळजी घेईन, असं स्पष्टीकरण गृहमंत्री देशमुख यांनी दिलं आहे.

(Chitra Wagh Attacked Anil Deshmukh over Viral hoto With Criminal)

हे ही वाचा :

अनिल देशमुखांभोवती गुन्हेगारांचं कोंडाळं, औरंगाबाद दौऱ्यातील फोटो व्हायरल

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.