भाजपच्या वेबसाईटवर रक्षा खडसेंबाबत घृणास्पद उल्लेख, गृहमंत्री अनिल देशमुखांकडून कारवाईचा इशारा

भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर भाजप खासदार रक्षा खडसे यांच्या नावापुढे संतापजनक आणि अपमानकारक शब्दात वर्णन करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवर दिली आहे (Disgusting reference about Raksha Khadse on BJP official website).

भाजपच्या वेबसाईटवर रक्षा खडसेंबाबत घृणास्पद उल्लेख, गृहमंत्री अनिल देशमुखांकडून कारवाईचा इशारा
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 10:55 PM

मुंबई : भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर भाजप खासदार रक्षा खडसे यांच्या नावापुढे संतापजनक आणि अपमानकारक शब्दात वर्णन करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवर दिली आहे. पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी ट्विटरवर याबाबतचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. स्वाती चतुर्वेदींचे ट्विट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रिट्विट करत भाजपकडे दोषींवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल कारवाई करेल, असा इशारा अनिल देशमुखांनी दिला आहे (Disgusting reference about Raksha Khadse on BJP official website).

“भाजपच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसे यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजपने दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी. अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल पुढील कारवाई करेल”, असं अनिल देशमुख ट्विटरवर म्हणाले आहेत (Disgusting reference about Raksha Khadse on BJP official website).

रक्षा खडसेंबाबत खरंच अपमानास्पद शब्द?

दरम्यान, भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर रक्षा खडसे यांच्याबाबत अजूनही असा काही उल्लेख आहे का? याची शाहनिशा करण्यासाठी आम्ही याबाबत पडताळणी केली. मात्र, भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर आम्हाला तसा काही उल्लेख आढळला नाही. कदाचित स्क्रिनशॉट व्हायरल झाल्यानंतर बदल करण्यात आल्याची शक्यता आहे किंवा दुसरं काही कारण असण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.