अनिल देशमुखांभोवती गुन्हेगारांचं कोंडाळं, औरंगाबाद दौऱ्यातील फोटो व्हायरल

कलाम कुरेशी आणि जफर बिल्डर हे एमआयएमचे माजी नगरसेवक आहेत, तर सय्यद मतीनही नगरसेवक पदावर होता (Anil Deshmukh Viral Photo with Criminals)

अनिल देशमुखांभोवती गुन्हेगारांचं कोंडाळं, औरंगाबाद दौऱ्यातील फोटो व्हायरल
Follow us
| Updated on: Feb 02, 2021 | 9:29 AM

औरंगाबाद : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याभोवती गुन्हेगारांचं कोंडाळं असलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनिल देशमुख औरंगाबाद दौऱ्यावर असताना हा फोटो काढल्याची माहिती आहे. कलाम कुरेशी, सय्यद मातीन आणि जफर बिल्डर हे गंभीर गुन्हे असलेले तिघे जण फोटोत पाहायला मिळत आहेत. (Anil Deshmukh Viral Photo with Criminals in Aurangabad)

एक गुटखाकिंग, दुसरा ट्रकचोर

गुन्हेगारांनी पुष्पगुच्छ देऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांचं स्वागत केल्याचं फोटोमध्ये दिसत आहे. या तिन्ही गुन्हेगारांवर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. गुन्हेगारांपैकी एक गुटखा किंग, तर दुसरा ट्रक चोर आहे. एका आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे.

तिन्ही गुन्हेगार माजी नगरसेवक

कलाम कुरेशी आणि जफर बिल्डर हे एमआयएमचे माजी नगरसेवक आहेत, तर सय्यद मतीनही नगरसेवक पदावर होता. जफर बिल्डर आणि सय्यद मतीन यांनी औरंगाबाद महापालिकेत गोंधळ घालून महापौरांवर खुर्च्या फेकल्या होत्या. सुरक्षारक्षकाला मारहाण केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे.

अनिल देशमुख चार दिवसांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. गुन्हेगारांसोबत गृहमंत्र्यांचा फोटो समोर आल्यामुळे सर्वत्र चर्चेला तोंड फुटलं आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

शक्ती कायद्याचा पुनरुच्चार

महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा महत्त्वाचा आहे. कायद्याची चौकट अधिक बळकट करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. कमी वेळेत निकाल लागणं गरजेचं आहे. समितीत सर्वपक्षीय आमदार आहेत. नागपूर, मुंबई आणि औरंगाबादमध्ये बैठक झाली. सर्व सूचना ऐकून घेतल्या. कायद्याचं प्रारुप आम्ही विधानसभेत ठेऊ. महिलांविरोधी गुन्ह्याचा 21 दिवसात तपास झाला पाहिजे. आरोपींना जन्मठेपेपर्यंत शिक्षेची तरतूद असेल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. (Anil Deshmukh Viral Photo with Criminals in Aurangabad)
महिलेने खोटी तक्रार केल्याचं तपासात उघड झालं, तर कारवाई होणार, असा इशाराही अनिल देशमुखांनी दिला. 36 कोर्ट सुरु करणार असून
विशेष टीम तपास करणार, साडे बारा हजार पोलिसांची भरती करणार असल्याची माहितीही गृहमंत्र्यांनी औरंगाबाद दौऱ्यात दिली होती.

संबंधित बातम्या :
(Anil Deshmukh Viral Photo with Criminals in Aurangabad)
Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.