AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरविंद सावंत विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या, धमक्या कसल्या देताय? चित्रा वाघ आक्रमक

तुमच्या सारख्यांच्या धमक्यांना घाबरणाऱ्या नाही, असे ट्वीट चित्रा वाघ यांनी केले आहे. (Chitra wagh on Navneet Rana)

अरविंद सावंत विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या, धमक्या कसल्या देताय? चित्रा वाघ आक्रमक
अरविंद सावंत, नवनीत राणा, चित्रा वाघ
| Updated on: Mar 23, 2021 | 6:55 AM
Share

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील प्रश्न संसदेत उपस्थित केल्यामुळे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी संसदेच्या लॉबीत धमकावल्याचा गंभीर आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. या प्रकरणावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आम्ही जिजाऊ सावित्रीच्या लेकी आहोत, तुमच्या सारख्यांच्या धमक्यांना घाबरणाऱ्या नाही, असे ट्वीट चित्रा वाघ यांनी केले आहे. (Chitra wagh on Navneet Rana allegation of threatening MP Arvind Sawant)

चित्रा वाघ यांचे ट्वीट 

“व्वा रे बहाद्दर….., महाराष्ट्र नावावर करून घेतलात की काय ?? अरविंद सावंत विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या, धमक्या कसल्या देताय, आम्ही जिजाऊ सावित्रीच्या लेकी आहोत तुमच्या सारख्यांच्या धमक्यांना घाबरणाऱ्या नाही,” असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

नवनीत राणा यांची तक्रार काय?

महाराष्ट्रात सुरु असलेलं मनसुख हिरेन हत्याकांड, सचिन वाझे प्रकरण, तसंच मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी लिहिलेल्या पत्रावरुन ठाकरे सरकारच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहेत. ते प्रश्न मी संसदेत उपस्थित केले. एक महिला खासदार होण्याच्या नात्याने महाराष्ट्रातील बिघडती कायदा आणि सुव्यवस्थेबाबत ठाकरे सरकारविरोधात संसदेत आवाज उठवला. त्यावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेच्या लॉबीत मला धमकी दिली. “तू महाराष्ट्रात कशी फिरते मी पाहतो. तुलाही जेलमध्ये टाकू”, अशा शब्दात त्यांनी मला धमकावलं. यापूर्वी शिवसेनेच्या लेटरहेडवर, फोनवर माझ्या चेहऱ्यावर अॅसिड टाकण्याची आणि जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

आज ज्या प्रकारे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी मला धमकी दिली आहे. हा फक्त माझा अपमान नाही तर माझ्यासह संपूर्ण देशातील महिलांचा अपमान आहे. त्यामुळे खासदार अरविंद सावंत यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करते, असं पत्र खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष, पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय गृहमंत्रालय, केंद्रीय संसदीय कार्य मंत्री आणि दिल्ली पोलिस आयुक्तांना लिहिलं आहे.

नवनीत राणा यांची लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात खासदार नवनीत राणा यांनी तक्रार केलीय. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. महाराष्ट्रातील प्रश्नांवर संसदेत बोलल्यामुळे सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केलाय. याबाबत पोलिसांत तक्रार देण्याची तयारीही राणा यांनी केल्याची माहिती मिळत आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यात सचिन वाझेला महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचं टार्गेट दिल्याच्या आरोपासह अनेक आरोपांचा समावेश आहे.

अरविंद सावंत यांनी आरोप फेटाळले

“नवनीत राणा यांनी केलेला आरोप साफ खोटा आहे. त्या मला येता जाता भैया-दादा म्हणून बोलतात. मी ही त्यांच्याशी बोलत असतो. एकतर त्या महिला आहेत आणि मी शिवसैनिक आहे. आम्ही महिलांना धमकावण्याचं काम करत नाहीत. जरी धमकावलं असं त्या म्हणत असतील तर त्या ठिकाणी आजुबाजूला कुणी असतील तर ते सांगितलं. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची बोलण्याची पद्धत आहे ती बरोबर नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलताना त्यांची बोलण्याची पद्धत, शैली ही अतिशय घृणास्पद असते. आजही त्या त्याच पद्धतीने बोलत होत्या”, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं. (Chitra wagh on Navneet Rana allegation of threatening MP Arvind Sawant)

संबंधित बातम्या :

Follow Us
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर विधान करणं भोवलं!
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
Datta Bharne | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा? कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत; उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत;  उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी सांगितलं बैठकीत काय घडलं?
मोठी बातमी! मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा
मोठी बातमी! मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर....
Parbhani | परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर, गावकऱ्यांची मदतीसाठी आर्त हाक!
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ!
तटकरेंचा तट तोडून आले! भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
Chhagan Bhujbal | तटकरेंचा तट तोडून आले! राज्यसभा अर्जावेळी भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं कृत्य, थेट स्टेटस  ठेवला अन्... पुढे काय घडलं?
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी