‘उदय शेट्टी मजनूमध्ये त्यांचा घुंगरू शेठ झालाय’, चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना टोला

अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात आग लागून 11 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या आगीच्या घटनेवरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला लश्र केलं. यावरुन आता भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून संजय राऊतांना जोरदार टोला लगावलाय.

उदय शेट्टी मजनूमध्ये त्यांचा घुंगरू शेठ झालाय, चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना टोला
चित्रा वाघ, संजय राऊत
| Edited By: | Updated on: Nov 09, 2021 | 7:07 PM

मुंबई : मागील आठवड्यात अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात आग लागून 11 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या आगीच्या घटनेवरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला लश्र केलं. यावरुन आता भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून संजय राऊतांना जोरदार टोला लगावलाय. (Chitra Wagh criticizes Shivsena MP Sanjay Raut)

‘सर्वज्ञानी..नगरच्या आगीचं खापर पण केंद्रावर फोडताहेत..वेंटीलिटर नव्हे तर राऊत यांची मानसिकताच निकृष्ट बनत चाललीय. आगीत होरपळलेल्यांची चिंता संजय राऊतांना नाहीये उलट राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोघांची मर्जी सांभाळावी लागतेय…उदय शेट्टी आणि मजनू मध्ये त्यांचा #घुंगरू_सेठ झालाय’, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय.

फडणवीसांच्या आरोपांनंतर चित्रा वाघांचा ठाकरे सरकारला टोला

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केलाय. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींकडून मलिकांनी कुर्ल्यातील एलबीएस रोडवरील जवळपास 3 एकर जागा विकत घेतल्याचा आरोप फडणवीस यांनी केलाय. त्याबाबतची कागदपत्रही फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दाखवली. त्यानंतर चित्रा वाघ यांनी ट्विट करुन मलिकांना टोला लगावलाय.

‘महाविकास आघाडी का हाथ, अंडरवर्ल्ड के साथ’

बॉम्ब ब्लास्टमध्ये ज्या निष्पाप जीवांचे बळी गेले त्यांच्या कुटुंबीयांशी, महाराष्ट्रआाच्या जनतेशी, मराठी माणसाशी या सरकारनं केलेला हा विश्वासघात आहे. देशवासियांच्या पाठीत महाविकास आघाडी सरकारकडून खंजीर खुपसला गेल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केलाय.

इतर बातम्या : 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मानेचा आणि मणक्याचा त्रास, दोन दिवसांत शस्त्रक्रियेची शक्यता

एसटी संपाबाबत राज्य सरकारची पहिली कारवाई, चंद्रपुरातील 14 कर्मचाऱ्यांचं निलंबन!

Chitra Wagh criticizes Shivsena MP Sanjay Raut