मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मानेचा आणि मणक्याचा त्रास, दोन दिवसांत शस्त्रक्रियेची शक्यता

मुख्यमंत्र्यांवर येत्या दोन ते तीन दिवसांत महत्वाची शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती मिळतेय. गिरगावमधील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. डॉ. शेखर भोजराज हे मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मानेचा आणि मणक्याचा त्रास, दोन दिवसांत शस्त्रक्रियेची शक्यता
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रास
Follow us
| Updated on: Nov 09, 2021 | 5:50 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान आणि मणक्याचा त्रास सुरु झालाय. मुख्यमंत्र्यांच्या पाठीचा मणका आणि मानेच्या स्नायूच्या दुखापतीचा त्रास बळावल्याची माहिती मिळतेय. उद्धव ठाकरे यांना मागील आठवड्यापासून हा त्रास जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांवर येत्या दोन ते तीन दिवसांत महत्वाची शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती मिळतेय. गिरगावमधील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. डॉ. शेखर भोजराज हे मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. (CM Uddhav Thackeray may undergo surgery for neck and spinal pain)

मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रास

उद्धव ठाकरे यांना मागील काही दिवसांपासून मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रास होत आहे. त्यासाठी त्यांनी गेल्या सोमवारी गिरगावातील सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी केली होती. तसेच यावेळी त्यांनी काही शारीरिक चाचण्या केल्या होत्या.

रुग्णालयात दाखल व्हावे लागण्याची शक्यता

मागील अनेक दिवसांपासून हा त्रास जाणवत असल्यामुळे ठाकरे यांनी भेटीगाठी टाळल्या आहेत. त्यांनी दिवाळीनिमित्त वर्षाबंगल्यावर पाहुण्यांकडून शुभेच्छा घेणेदेखील टाळले होते. सध्या ठाकरे यांचा हा त्रास कमी होत नसल्याची माहिती आहे. त्यामुळे पुढील उपचारासाठी मुख्यमंत्र्यांना काही दिवस रुग्णालयात दाखल व्हावे लागण्याची शक्यता आहे.

पालखी मार्गाच्या कार्यात सर्वतोपरी सहकार्य करेल- मुख्यमंत्री

पालखी मार्गाचा विकास करणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. ऊन, वारा, पाऊस आणि खड्ड्यांची पर्वा न करता आपल्या वारकऱ्यांच्या मार्गातील अडथळे दूर करण्याची आपली जबाबदारी आहे. यासाठी महाराष्ट्र प्रत्येक पाऊलावर तुमच्यासोबत आहे हे वचन मी या निमित्ताने देऊ इच्छितो, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत. पालखी मार्ग भूमिपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हीसीवरून संवाद साधला.

इतर बातम्या :

एसटी संपाबाबत राज्य सरकारची पहिली कारवाई, चंद्रपुरातील 14 कर्मचाऱ्यांचं निलंबन!

एसटी महामंडळ संपाबाबत अवमान याचिका दाखल करणार! संप मागे घेण्याचं परिवहन मंत्र्यांचं आवाहन

CM Uddhav Thackeray may undergo surgery for neck and spinal pain

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.