BREAKING : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री 8.30 वाजता जनतेशी संवाद साधणार; कोरोनासंदर्भात महत्त्वाची घोषणा करणार?

BREAKING : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री 8.30 वाजता जनतेशी संवाद साधणार; कोरोनासंदर्भात महत्त्वाची घोषणा करणार?
CM Uddhav Thackeray

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8.30 वाजता महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधणार आहे.(CM Uddhav Thackeray  today address the state live) 

Namrata Patil

| Edited By: prajwal dhage

Apr 30, 2021 | 6:53 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज (30 मे 2021 ) रात्री 8.30 वाजता महाराष्ट्रातील जनतेशी पुन्हा एकदा संवाद साधणार आहे. राज्यातील वाढता कोरोना, लॉकडाऊन, कोरोना लसीकरण या मुद्द्यांवर उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधण्याची शक्यता आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे एखादी महत्त्वाची घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे. (CM Uddhav Thackeray  today address the state live)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद

उद्या 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला संबोधित करतील. फेसबुक लाईव्हद्वारे ते राज्यातील जनतेशी ठीक रात्री 8.30 वाजता संवाद साधणार आहेत. दरम्यान मुख्यमंत्री आज नेमकं काय संवाद साधणार याकडे सर्व जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे शासनाच्या उपाययोजनाही कोरोनाची साखळी तोडण्यात तोकड्या पडत असल्याचं चित्र निर्माण झाल आहे. राज्यातील वाढत्या कोरोनामुळे महाराष्ट्रातील लॉकडाऊन आणखी 15 दिवसांनी वाढवण्यात आला आहे. तर दुसरीकडे देशभरात उद्यापासून 18 वर्षांवरील व्यक्तींना कोरोना लसीकरण केले जाणार आहे. या सर्व मुद्द्यांवर उद्धव ठाकरे आज बोलण्याची शक्यता आहे.

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतीच

राज्यात आज 66,159 नवीन रुग्णाांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 45,39,553 झालीय. राज्यात काल 29 एप्रिलला राज्यात एकूण 6,70,301 रुग्ण सक्रिय आहेत. तर काल दिवसभरात 68,537 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. राज्यात आजमितीस एकूण 37,99,266 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 83.69 % एवढे झालेय.

सध्या राज्यात 41,19,759 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत

आजमितीस तपासण्यात आलेल्या 2,68,16,075 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 45,39,553 (16.93 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आलेत. सध्या राज्यात 41,19,759 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर 30,118 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

संबंधित बातम्या : 

Maharashtra Corona Update : राज्यात 66,159 नव्या कोरोना रुग्णांचं निदान, 771 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

Lockdown Extended in Maharashtra: राज्यातला लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवला, कडकडीत बंद होणार, निर्बंधांमध्ये वाढ

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें