नांदेड जिंकण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा मास्टरप्लॅन?

नांदेड : लोकसभेच्या निवडणुकीत मोदी लाटेतही नांदेडमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे विजयी झाले होते. मोदींच्या विक्रमी सभेनंतरही भाजपला इथे मोठं अपयश आलं होतं. तब्बल 80 हजारांपेक्षा जास्त मताधिक्य घेत अशोक चव्हाण विजयी झाले होते. खरंतर त्यावेळेला स्थानिक नेतृत्व जोपासण्यासाठी लोकांनी चव्हाण यांना विजयी केलं. मात्र भाजप नेत्याला हिच सल अद्याप जाणवतेय. त्यासाठी भाजपाने नांदेडसाठी […]

नांदेड जिंकण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा मास्टरप्लॅन?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

नांदेड : लोकसभेच्या निवडणुकीत मोदी लाटेतही नांदेडमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे विजयी झाले होते. मोदींच्या विक्रमी सभेनंतरही भाजपला इथे मोठं अपयश आलं होतं. तब्बल 80 हजारांपेक्षा जास्त मताधिक्य घेत अशोक चव्हाण विजयी झाले होते. खरंतर त्यावेळेला स्थानिक नेतृत्व जोपासण्यासाठी लोकांनी चव्हाण यांना विजयी केलं. मात्र भाजप नेत्याला हिच सल अद्याप जाणवतेय. त्यासाठी भाजपाने नांदेडसाठी मास्टरप्लान बनवला आहे. स्वतः मुख्यमंत्री यात लक्ष घालणार आहेत.

नांदेडमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या हालचालींना आता वेग आला आहे. काँग्रेसने लोकसभेसाठी अमिता चव्हाण यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी केलीय. तर पक्षाने आदेश दिल्यास आपण निवडणूक लढवणार असे स्वतः अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे काँग्रेसचा हा गड जिंकण्यासाठी भाजपने तयारी सुरु केलीय. काँग्रेसकडून अमिता चव्हाण मैदानात आल्या तर भाजपा अशोक चव्हाण यांचे मेहुणे असलेल्या भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनबाई मीनल खतगावकर यांना मैदानात उतरवणार अशी माहिती मिळतेय. भास्करराव पाटील खतगावकर यांची जिल्ह्यात चांगली पकड आहे. त्यामुळे असं झालं तर ही लढत रंगतदार होईल.

दुसरीकडे, नांदेडमधून पुन्हा अशोक चव्हाणच लोकसभेच्या रिंगणात असतील अशी शक्यता आहे. ही शक्यता गृहीत धरून मुख्यमंत्र्यांचे मित्र असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील यांना भाजप रिंगणात उतरवू शकते. एकेकाळचे सहकारी असलेले अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील एकमेकांच्या विरोधात उभे राहिले तर ही लढत राज्यात लक्षवेधी ठरेल. कारण इथ मैदानात प्रताप पाटील असले तरी त्यांच्या मागे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा राहणार आहे. आजी – माजी मुख्यमंत्र्यांची लढाई म्हणून ही निवडणूक ओळखल्या जाऊ शकते. भाजपा ने या दृष्टीने तयारी केल्याचेही सांगण्यात येतेय.

भाजपाची ही तयारी असली तरी कॉंग्रेस नेतृत्व मात्र मनपा निवडणुकिचा दाखला देत आहेत. मनपा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली होती. मात्र त्याचा फारसा फायदा भाजपला झाला नव्हता. कारण एक सभा सोडली तर भाजपाने मनपासाठी काहीही केल नाही. ‘मुदखेड पॅटर्न’ राबवत काँग्रेसने एकहाथी मनपा जिंकली. खर तर भाजप नेतृवाला मनपा निवडणुकीत मुदखेड पॅटर्नचा अंदाजच आला नाही. त्यानंतर मनपात काँग्रेसला मतदान करणाऱ्या नांदेडकराना अद्याप चांगले रस्ते,  मुबलक पाणी मिळालच नाही. राज्यात , देशात सत्ता नाही म्हणून नांदेडला निधी नाही अस काँग्रेसचे ठरलेले उत्तर ऐकून लोक कंटाळून गेलेत. ही वस्तुस्थिती पाहता भाजपने नांदेड लोकसभेसाठी कंबर कसलीय, त्यात काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

निवडणुकीच्या तारखा जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

लोकसभा निवडणूक : तुमच्यासाठी 5 अत्यंत महत्त्वाच्या बातम्या

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.