Cm Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर मोठी कुरघोडी, शिंदेंकडून शिवसेनेच्या नव्या नियुक्त्या जाहीर

| Updated on: Jul 27, 2022 | 9:15 PM

या नियुक्त्यामुळे पक्षाचे काम अधिक जोमाने करता येणे शक्य होणार असून पक्ष विस्तारासाठी देखील हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे, असेही शिंदे म्हणाले आहेत.

Cm Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर मोठी कुरघोडी, शिंदेंकडून शिवसेनेच्या नव्या नियुक्त्या जाहीर
एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर मोठी कुरघोडी, शिंदेंकडून शिवसेनेच्या नव्या नियुक्त्या जाहीर
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई : सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का दिलाय. एकीकडे शिवसेना (Shivsena) कुणाची अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तर शिवसेना आपलीच असल्याचा दावा ठाकरे आणि शिंदे गटाकडून केला जातोय. आपलीच खरी शिवसेना हे सिद्ध करण्यासाठी आता ही लढाई सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर मोठी कुरघोडी केलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेच्या नवीन पदांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ही नियुक्तीपत्रे आज प्रदान करण्यात आली. विशेष म्हणजे आजच उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे, त्याच दिवशी त्यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

शिंदेंकडून नव्या नियुक्त्या जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेच्या नवीन पदांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ही नियुक्तीपत्रे आज प्रदान करण्यात आली. शिवसेनेच्या सचिवपदी कामगार नेते किरण पावसकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांची शिंदे यांनी सचिव पदावर नियुक्ती केली आहे.

आधी जारी केलेल्या नियुक्त्याही कायम

तर आधी जाहीर करण्यात आल्याप्रमाणे आमदार दिपक केसरकर हेच पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती कायम राहणार आहे. याशिवाय शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील, शिवसेना उपनेते आणि आमदार उदय सामंत, किरण पावसकर, आमदार गुलाबराव पाटील आणि दहिसरच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आलेली आहे. तर अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची पक्षाच्या खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नियुक्तीपत्रांचं वाटपही करण्यात आलंय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ही नियुक्तीपत्रे किरण पावसकर आणि संजय मोरे याना देण्यात आली. तर बाकी शिलेदराना देखील ती लवकरच देण्यात येतील. या नियुक्त्यामुळे पक्षाचे काम अधिक जोमाने करता येणे शक्य होणार असून पक्ष विस्तारासाठी देखील हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे. असेही शिंदे म्हणाले आहेत.

कोर्टातली लढाई कोण जिंकणार?

तर आमदारांच्या अपात्रतेचा आणि शिवसेना नेमकी कुणाची हा वाद कोर्टात पोहोचला आहे.यावर एक सुनावणी पार पडली आहे. तर दुसरी सुनावणी ही 1 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे कोर्टातला निकाल कुणाच्या बाजुने लागतो? याकडेही संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.