AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM Eknath Shinde : ‘आमचा एकही आमदार मंत्री झाला नाही तरी आम्ही शिंदेसाहेबांसोबत’, मंत्रिपदावरुन नाराजीच्या चर्चेला केसरकरांकडून ब्रेक

'आमच्यापैकी एकाही आमदाराने मंत्रीपद मागितलं नाही. कोणतीही यादी तयार नाही. एकनाथ शिंदे जर म्हणाले की आमचा एकही आमदार मंत्री झाला नाही तरीही आम्ही शिंदेसाहेबांसोबत आहोत. आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आलो आहोत'

CM Eknath Shinde : 'आमचा एकही आमदार मंत्री झाला नाही तरी आम्ही शिंदेसाहेबांसोबत', मंत्रिपदावरुन नाराजीच्या चर्चेला केसरकरांकडून ब्रेक
दीपक केसरकर, प्रवक्ते, शिंदे गटImage Credit source: Google
| Edited By: sagar joshi | Updated on: Jul 01, 2022 | 9:32 PM
Share

मुंबई : महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि राज्यात भाजप आणि शिवसेनेतील शिंदे गटाचं सरकार आलं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, आता मंत्रिपदाच्या वाटपावरुन शिंदे गटात नाराजी आणि रस्सीखेच सुरु असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. शिंदे गटातील आमदारा संजय सिरसाट (Sanjay Shirsat) यांना मंत्रिपद हवं आहे. मात्र, एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात शिंदे गट 3 मंत्रिपद कसा देणार? असाही प्रश्न आहे. तसंच बच्चू कडू यांनीही कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केलीय. अशावेळी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी माध्यमांसमोर येत मंत्रिपदावरुन नाराजीच्या सर्व बातम्या फेटाळून लावल्या आहेत.

‘एकही आमदार मंत्री झाला नाही तरीही आम्ही शिंदेसाहेबांसोबत’

केसरकर म्हणाले की, आमच्यापैकी एकाही आमदाराने मंत्रीपद मागितलं नाही. कोणतीही यादी तयार नाही. एकनाथ शिंदे जर म्हणाले की आमचा एकही आमदार मंत्री झाला नाही तरीही आम्ही शिंदेसाहेबांसोबत आहोत. आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आलो आहोत. तसंच केसरकर यांनी सांगितलं की फडणवीस यांच्या काळातील काही योजना मागील काही वर्षात बंद पडल्या होत्या त्या आता पुन्हा सुरु होतील. जलयुक्त शिवार हे फडणवीस यांचं स्वप्न होतं. योजना अमलात येताना काही चुका होतात. त्याचा दोष प्रमुखावर कसा दिला जाऊ शकतो? त्याचबरोबर उद्धव ठाकरे हे फार मोठे नेते आहेत. त्यांच्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही. आम्हाला त्याचा फार आदर आहे. त्यांचा गैरसमज झाला असेल तर काळाच्या ओघात हे गैरसमज दूर होतील असा विश्वासही केसरकर यांनी व्यक्त केलाय.

केसरकरांचं पुन्हा एकदा संजय राऊतांना आव्हान

दीपक केसरकर यांनी आजही संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत यांना काय माहिती आहे शरद पवार आणि माझे संबंध काय आहेत ते? शरद पवार यांनी मला खूप शिकवलं आहे, आयुष्यात आतापर्यंत मी शरद पवार यांच्यावर टीका केली नाही. दोनच व्यक्तींना मी आदर्श मानलं एक म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळसाहेब ठाकरे आणि दुसरे म्हणजे शरद पवार आहेत. मी कधी माध्यमांसमोर येत नाही पण या 50 आमदारांच्या मतदार संघातील नागरिकांना समजावणे हे खूप गरजेचं आहे. संजय राऊत हे कधी नागरिकांमधून निवडून आले नाहीत. संजय राऊत तुम्ही आमच्या मतांवर खासदार झाले आहात. तुम्ही राजीनामा द्या आणि पुन्हा कोणत्या आमदारांच्या मतांवर निवडून येता तसे या, असं आव्हानच केसरकर यांनी राऊतांना दिलंय.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?