सोनिया गांधी मेलेल्या उंदरासारख्या, हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींवर टीका करताना जीभ घसरली (Haryana cm manohar lal khattar criticism on soniya gandhi) आहे.

Haryana cm manohar lal khattar criticism on soniya gandhi, सोनिया गांधी मेलेल्या उंदरासारख्या, हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली

चंदीगड : हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींवर टीका करताना जीभ घसरली (Haryana cm manohar lal khattar criticism on soniya gandhi) आहे. महाराष्ट्रासह हरियाणातही विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यात चांगलीच चुरस दिसत आहे. सर्व नेते एकमेकांवर टीका करत आहेत. या दरम्यान मुख्यमंत्री खट्टर यांची जीभ घसरल्याने विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली (Haryana cm manohar lal khattar criticism on soniya gandhi) जात आहे.

या निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्री खट्टर यांनी सोनिया गांधींची तुलना मेलेल्या उंदरासोबत केली आहे. “राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस अध्यक्षपदासाठी संपूर्ण देश फिरला. पण डोंगर पोखरला आणि त्यात मेलेलं उंदीर मिळाला”, असं खट्टर सेनापती येथील सभेत म्हणाले.

“लोकसभा निवडणुकीत पराभव पत्कारल्यानंतर राहुल बाबा यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि सांगितले की, नवीन अध्यक्ष आणा. नवीन अध्यक्ष हा गांधी कुटुंबाच्या बाहेरील असावा. आम्हाला वाटलं चांगली गोष्ट आहे. घराणेशाही बंद होत आहे चांगलं आहे. पण हे लोक नव्या अध्यक्षासाठी संपूर्ण देशभर फिरले. पण तीन महिन्यानंतर सोनिया गांधी यांना अध्यक्षपदी बसवण्यात आले. याचा अर्थ डोंगर पोखरला आणि मेलेला उंदीर मिळाला”, असं खट्टर म्हणाले.

यापूर्वीही मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सोनिया गांधींवर निशाणा साधला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी दहशतवाद्यांसाठी रडतात. दहशतवाद्यांची बाजू घेणारे 370 हटवल्याचे समर्थन कशाला करतील, असं वक्तव्य खट्टर यांनी यापूर्वी केले होते.

भुपेंद्र सिंह हुड्डासारखे मोठे नेते आर्टिकल 370 हटवल्याचे समर्थन करतात, त्यांना त्यांच्या पक्षाचे समर्थन मिळत नाही. कारण काँग्रेस दहशतवादी मेल्यानंतर रडत असते. सोनीया गांधीही दहशतवाद्यांचे मृतदेह पाहून रडतात, असंही खट्टर म्हणाले होते.

दरम्यान, हरियाणा आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा प्रचार जोरदार सुरु आहे. या दरम्यान काँग्रेस आणि भाजपचे नेते एकमेकांवर टीका करत आहेत. येत्या 21 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान आहे, तर 24 ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *