अंगावर येण्याआधी निदान आरशात तोंड तर बघा, वीजबिलाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना झापले; दिले ‘हे’ संकेत

| Updated on: Nov 27, 2020 | 10:56 AM

अंगावर येण्याआधी निदान बाहेर पडताना आरशात तुमचं तोंड बघा, अशा भाषेत उद्धव ठाकरेंनी विरोधकांना झापले. (CM Uddhav Thackeray On Electricity Bill Issue)

अंगावर येण्याआधी निदान आरशात तोंड तर बघा, वीजबिलाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना झापले; दिले हे संकेत
Follow us on

मुंबई : महाविकासआघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. नुकतंच ही मुलाखत प्रसारित करण्यात आली. या मुलाखतीतून उद्धव ठाकरेंनी वीजबिलाच्या मुद्द्यावर भाष्य केले. आमच्या अंगावर येण्याआधी निदान बाहेर पडताना आरशात तुमचं तोंड बघा, अशा भाषेत उद्धव ठाकरेंनी विरोधकांना झापले. (CM Uddhav Thackeray On Electricity Bill Issue)

गेल्या काही दिवसांपासून वाढीव वीजबिलाच्या प्रश्नावर वातावरण पेटतं आहे, असा प्रश्न राऊत यांनी उद्धव ठाकरेंना केला होता. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “पेटत नाही. मुळामध्ये ‘वाढीव’ हा जो शब्द आहे तो वाढीव आहे का? हा विषय मंत्रिमंडळात पण चर्चिला जातो. खरंच मीटरमुळे काही बिले वाढलीत का? का दोन-तीन महिन्यांची बिले एकदम आली आहेत? त्यामुळे ती वाढ झाली आहे,” असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.

“अनेक ठिकाणी जिथे जिथे तक्रारी आल्या, तिथे तिथे या वीज मंडळातील लोकं जाऊन मीटर चेक करून आली. ती चेक केल्यानंतर बहुतेकांच्या शंकेचं निरसन झालेलं आहे. तरीदेखील अजूनही तो विषय मी काही सोडलेला नाही. मंत्रिमंडळाने सोडलेला नाही. काय करता येऊ शकतं. काय करायला पाहिजे. या गोष्टींवर आमचा विचार सुरू आहे. पण एक गोष्ट सांगतो, जे काय आता सगळे थयथयाट करण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांच्यात आता काय ताकदच राहिलेली नाही,” असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.

“साधारणतः जागतिक बाजारपेठेत क्रूड तेलाचे भाव आज काय आहेत हो? पर लिटर… काल मी माहिती काढली, आजसुद्धा साधारणतः पर लिटर 20 रुपयांच्या आसपास आहेत… आणि आपल्याकडे 88 रुपये आहे… का नाही कमी करत? का नाही तुम्ही त्याच्यावर आंदोलन करत? गॅसचे भावही वाढले होते मध्ये… गॅसची सबसिडीही काढली… पण क्रूड तेलाचे भाव कमी झाल्यानंतरसुद्धा आपल्या देशात पेट्रोल, डिझेलचे भाव हे का चढते आहेत?” असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

“बाकी जागतिक अर्थव्यवस्था वगैरे यावर मला बोलायचे नाही… पण 2014 च्या आधी तुमचा एक तो मुद्दा होता की, डॉलर किती चढले… तेव्हा मला वाटतं 59 रुपये होता… आता किती झालाय डॉलरचा भाव? काय व्यवस्था तुम्ही केली? आमच्या अंगावर येण्याआधी निदान बाहेर पडताना आरशात तुमचं तोंड तर बघ. पण काय झालंय, हल्ली बरेच जण स्वतःचं तोंड आरशात बघितल्यानंतरही बोंबलतात की, भ्रष्टाचार झाला… भ्रष्टाचार झाला. सगळे अवाक होतात,” असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला. (CM Uddhav Thackeray On Electricity Bill Issue)

संबंधित बातम्या : 

मी नामर्द नाही, ‘ईडी’ वगैरेचा गैरवापर करून दबाव आणाल तर याद राखा, उद्धव ठाकरेंचा रोखठोक इशारा

तुम्ही ड्रायव्हिंग का करताय?, उद्धव ठाकरे म्हणतात…