Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ बिनविरोध निवडून येताच काँग्रेस आक्रमक, धक्कादायक आरोप लावले

Devendra Fadnavis : चिखलदरा नगरपरिषद नगरसेवक पदाच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ बिनविरोध निवडून आलेत. त्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसने धक्कादायक आरोपांची मालिका सुरु केली आहे.

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ बिनविरोध निवडून येताच काँग्रेस आक्रमक, धक्कादायक आरोप लावले
Devendra fadnavis
| Updated on: Nov 20, 2025 | 2:11 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ चिखलदरा नगरपरिषद नगरसेवक पदाच्या निवडणुकीत बिनविरोधी विजयी झाले आहेत. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आक्रमक होत आरोप केले. “मत चोरीचा हा भाग आता उमेदवार चोरीचा दुसरा भाग बनला आहे” अशा शब्दात हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. “जो माणूस तिथे राहत नाही, त्याचं नाव मतदार यादीत टाकलं जातं. हे मुख्यमंत्र्यांचे अशोभनीय काम आहे. याचा धिक्कार करतो, याचा निषेध करतो” असा हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. “मुख्यमंत्र्यांचा एक मामेभाऊ व धर्मदाय आयुक्त आहे तो जमीन विकतो. दुसऱ्याला नगरसेवक बनवून चिखलदरा मधील जमिनी खरेदी करण्याकरता नगरसेवक केलं जात आहे” असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

“मुख्यमंत्र्यांची ही गुंडशाही आहे, ती आता आम्ही खपून घेणार नाही. उमेदवाराला उमेदवारी मागे घेण्यासाठी धमक्या दिल्या जातात. अपहरण केलं जात आहे. आमिष दाखवलं जात आहे. दडपशाही केली जात आहे” असे आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केले. “यामध्ये आर्थिक देवाण-घेवाण, दमदाटी,जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातायत” असा हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठा आरोप केला. ‘मुख्य आक्का चिखलदरा प्रकरणाचा देवेंद्र फडणवीस आहेत’ असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

‘महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात क्रूर मुख्यमंत्री’

“देवेंद्र फडणवीस याठिकाणी दमदाटी आणि गुंडागर्दी करत आहेत. मुख्यमंत्री पदाचा दुरुपयोग करत आहेत. उमेदवारांना धमक्या दिल्या, पैसे दिले. यांचा डोळा तिथल्या जमिनीवर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात क्रूर मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातील” असं धक्कादायक वक्तव्य काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केलं. “ज्या हिशोबाने संविधानाची तोडफोड करत आहे.ते योग्य नाही. भाजपमध्ये ओरिजनल कमी आणि भाड्याचे लोक जास्त आहेत. कलोती यांचा पराभव झाला असता, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाचक्की झाली असती म्हणून दमदाटी केली.भाजप ही रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या खुंट्याला बांधली आहे” असा दावा यशोमती ठाकूर यांनी केलाय.