निलेश राणेंविरोधातला उमेदवार ठरला, काँग्रेसची महाराष्ट्रातली दुसरी यादी जाहीर

निलेश राणेंविरोधातला उमेदवार ठरला, काँग्रेसची महाराष्ट्रातली दुसरी यादी जाहीर

नवी दिल्ली : काँग्रेसने महाराष्ट्रातली दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये नंदुरबार, धुळे, वर्धा, यवतमाळ-वाशिम, मुंबई दक्षिण मध्य, शिर्डी आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. काँग्रेस आणि आघाडीकडून रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांना मदत केली जाईल, अशी शक्यता होती. पण काँग्रेसने या ठिकाणी उमेदवार उतरवला आहे. काँग्रेसने आतापर्यंत देशभरातील एकूण 146 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत.

महाराष्ट्रातील सात उमेदवारांची नावे

नंदुरबार – के. सी. पाडवी

धुळे – कुणाल पाटील

वर्धा – चारुलता टोकस

यवतमाळ-वाशिम – माणिकराव ठाकरे

मुंबई दक्षिण मध्य – एकनाथ गायकवाड

शिर्डी – भाऊसाहेब कांबळे

रत्नागिरी-सिंधुदुर्ग – नवीनचंद्र बांदिवडेकर

पाहा संपूर्ण यादी

यापूर्वी काँग्रेसने महाराष्ट्रातली पहिली यादी जाहीर केली होती. त्यामध्ये

नागपूर – नाना पटोले

गडचिरोली – नामदेव उसेंडी

मुंबई उत्तर मध्य – प्रिया दत्त

मुंबई दक्षिण – मिलिंद देवरा

सोलापूर – सुशील कुमार शिंदे

Published On - 11:33 pm, Tue, 19 March 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI