VIDEO: रोड शोदरम्यान खुल्या ट्रकमध्ये प्रियांका गांधींनी ठेका धरला

  • Updated On - 3:38 pm, Fri, 5 July 19
VIDEO: रोड शोदरम्यान खुल्या ट्रकमध्ये प्रियांका गांधींनी ठेका धरला


चंदीगड :  काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी या सातव्या टप्प्यातील प्रचारात व्यस्त आहेत.पंजाबमध्ये त्यांनी रोड शोही केला. खुल्या ट्रकमधून हा रोड शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रियांका गांधींच्या रोड शोमध्ये गाणी सुरु होती. त्यावेळी प्रियांकांनीही हलका ठेका धरला.

मेरा घरवाला पंजाबी – प्रियांका गांधी

दरम्यान, प्रियांका गांधी यांनी मंगळवारी रॅलीला संबोधित केलं. प्रियांकांनी बठिंडामध्ये पंजाबीमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न केला. प्रियांका म्हणाल्या, “इथे येऊन मला आनंद होत आहे. मेरा घरवाला (रॉबर्ट वाड्रा) पंजाबी आहे. प्रत्येक संकटाचा सामना त्यांनी हसतमुखाने केला. मी पंजाबच्या भूमीला सलाम करते. पंजाबी माणूस प्रत्येक संकटाचा सामना तितक्याच ताकदीने करतो”

सातव्या टप्प्यात पंजाबमधील 13 जागांसाठी 19 मे रोजी मतदान होणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI