कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा एकत्र प्रवास, बाळासाहेब थोरात-सुजय विखे एकाच विमानात

एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून नगर जिल्ह्यात परिचीत असलेले काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे आज एकत्र पाहायला मिळाले.

कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा एकत्र प्रवास, बाळासाहेब थोरात-सुजय विखे एकाच विमानात

अहमदनगर :  एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून नगर जिल्ह्यात परिचीत असलेले काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे आज एकत्र पाहायला मिळाले. आमदार बाळासाहेब थोरात आणि खासदार सुजय विखे यांनी एकाच विमानातून प्रवास केला.

एकमेकांचे राजकीय कट्टर प्रतिस्पर्धी असलेले बाळासाहेब थोरात आणि सुजय विखे यांना सोमवारी योगायोगाने दिल्लीला एकाच विमानाने जावं लागलं. दोघेही शिर्डीवरुन दिल्लीला रवाना झाले. सकाळी 10.30 वाजता स्पाईस जेटच्या विमानात बिझनेस क्लासमध्ये दोघांनाही शेजारी शेजारीच जागा मिळाली.

दरम्यान शेजारी-शेजारी बसलेल्या थोरात-विखे यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

लोकसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरातांनी अनेकवेळा सुजय विखे आणि त्यांचे वडील राधाकृष्ण विखे यांच्यावर टीका केली होती. मात्र निवडणुकीनंतर प्रथमच दोघांनी एकत्र प्रवास केल्याने नगरच्या राजकारणात एक; चर्चेचा विषय बनला.

दोन दिवसापूर्वीच बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताने समविचारी पक्षांना सोबत घेऊ असं थोरात यांनी म्हटलं. मात्र नगरमध्ये विखे विरुद्ध थोरात हा वाद नवा नाही. लोकसभा निवडणुकीत विखेंनी नगरसह शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाजप-शिवसेनाचा प्रचार करुन दोन्ही जागा जिंकून आणल्या. त्यामुळे बाळासाहेब थोरातांकडे महाराष्ट्र काँग्रेसची जबाबदारी असली, तरी त्यांच्या होमग्राऊंडवर त्यांना विखेंचा सामना करायचा आहे.

संबंधित बातम्या  

विखेंनी जे मागितलं ते पक्षानं दिलं, मुलाला त्यांनी समजवायला हवं होतं : थोरात

मनसेला सोबत घेण्याचे प्रयत्न, बाळासाहेब थोरातांचे मोठं वक्तव्य    

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरातांची वर्णी    

हॅप्पी बर्थ डे राधाकृष्ण विखे : बाळासाहेब थोरात 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI