नाशिक : महाराष्ट्रात सत्तांतराला (Maharashtra Political Crisis) आता नऊ महिने होत आले आहेत. असं असताना महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) नेत्यांमध्ये सरकार पडल्याचं शल्य अजूनही जीवंत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते वारंवार त्या मुद्द्यावरुन भाजप (BJP) आणि शिवसेनेवर (Shiv Sena) टीका करत असतात. विशेष म्हणजे आज अनोखी गोष्ट बघायला मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मंचावर बसलेले असताना काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि आमची संधी घालवली, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.