पेट्रोलने सेंच्युरी मारली, गॅसचे दर वाढले; काँग्रेसच्या काळात महागाईवर आंदोलन करणारे कुठं लपले?: बाळासाहेब थोरात

| Updated on: May 30, 2021 | 1:34 PM

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारच्या कारभारावर टीकास्त्र सोडलं आहे. ( Congress Balasaheb Thorat Modi Government)

पेट्रोलने सेंच्युरी मारली, गॅसचे दर वाढले; काँग्रेसच्या काळात महागाईवर आंदोलन करणारे कुठं लपले?: बाळासाहेब थोरात
बाळासाहेब थोरात
Follow us on

नाशिक: केंद्रातील मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे काँग्रेसने राज्यभरात ठिकठिकाणी निषेध नोंदवला आहे. तसेच पत्रकार परिषदा आणि कार्यक्रम घेऊन मोदी सरकारच्या कारभाराची पोलखोल केली आहे. नाशिक येथे काँग्रेसचे प्रमुख नेते आणि महसलू मंत्री बाळासाहेभ थोरात यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी मोदी सरकारवर भाजपवर टीका केली. भाजपनं सत्तेत येण्यासाठी दिलेली आश्वासनं, वाढती महागाई, कोरोना स्थितीवरुन थोरात यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. (Congress leader Balasaheb Thorat slam Modi Government over various issues like petrol hike and corona)

बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारवर निशाणा साधताना भाजपनं दरवर्षी 2 कोटी तरुणांना रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं त्याची आठवण करुन दिली. भाजप आणि नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक भारतीयांच्या खात्यात 15 लाख रुपये टाकण्याचं आश्वासन दिलं होतं. काळा पैसा भारतात आणणार असं म्हटलं होत, ही आश्वासन पूर्ण झाली नसल्याचा आरोप थोरात यांनी केला.

पेट्रोलची सेंच्युरी

आता पेट्रोलने सेंच्युरी मारली आणि गॅस वाढले आहेत. काँग्रेसच्या काळात महागाईवर आंदोलन करणारे आता कुठं लपून बसले आहेत, असा सवाल ही थोरात यांनी केला. महागाई वाढल्यानं सर्व सामान्यांच्या खिशातील पैसे गेले. कच्चा तेलाच्या किमती कमी झाल्या तरी आपल्याकडे वाढ सुरू आहे. खाद्य तेल 60 रु लिटर होत ते 200 रु वर गेलं आहे.

सर्व सामान्य माणसाचं बजेट बिघडलं

पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या, खाद्यतेल 200 रुपयांवर गेलं, या सर्वांमुळे सर्वसामान्यांच बजेट कोलमडलं आहे. खतांच्या किंमती वाढल्या आहेत. जीएसटीचा भार वाढला. नोटाबंदी अयशस्वी प्रयोग मोदी सरकारनं केला. जीएसटीचा भार ही सर्व सामान्य माणसावर पडत असल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले.

कामगार कायद्यात बदल केले गेले

काँग्रेसनं कामगारांच्या चळवळीं हक्क देण्याचे कायदे केले. मोदी सरकारच्या काळात कामगार कायद्यात बदल केले गेले. आताचे कायदे मालकाला परवडणारे आहेत.

शेतकरी आंदोलकांची समस्या पंतप्रधान समजून घेत नाहीत

बाळासाहेब थोरात यांनी शेतकरी आंदोलनावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला. शेतकरी आंदोलन सुरू आहे त्याला 6 महिने झाले आहे. मोदी सरकारनं त्या काळ्या कायद्याविरोधात आंदोलनाची दखल घेतली नाही. शेतकऱ्यांची अवहेलना केली गेली, आंदोलन दडपल गेलं. त्यांची समस्या काय आहे पंतप्रधान समजून घेत नाहीत. देश एका माणसाच्या हुकुमावर चालवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोपही त्यांनी केला.

कोरोनाचं संकट हाताळण्यात मोदी सरकार अपयशी

कोरोनात ही मेळावे झाले, त्यामुळे संकट वाढलं. पंतप्रधानांनी थाळी वाजवायला लावले, दिवे लावयला लावले हे उपाय नाहीत. आपली प्रतिमा मोठी करण्यासाठी दुसऱ्या देशाला लस देण्याचा हा अहकांरी प्रयत्न केला गेला. कोरोनातही निवडणुका झाल्या,धार्मिक मेळावे झाले. कोरोनाचं संकट हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरलंय.

लसीकरणाच्या गोंधळाला मोदी सरकार जबाबदार

लसीकरणाबाबत देशात गोंधळ सुरु आहे. त्या गोंधळाला मोदी सरकार सर्वस्वी जबाबदार आहे. लस घेण्याचा महोत्सव घेतला, पण लस नाही अशी स्थिती होती. कोणत्या आधारावर महोत्सव जाहीर केला माहिती नाही. लसीचं अ‌ॅप तयार केलं गेलं,सर्व कंट्रोल केंद्राकडे घेतले, सावळा गोंधळ घातला.गंगेच्या पात्रात अनेकांची शवं वाहत होते, याला जबाबदार केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेशातील भाजप सरकार आहे, असी आरोप ही थोरात यांनी केला.

संबंधित बातम्या:

आमच्या कार्यक्रमात तुम्ही काय करताय?; भाई जगताप पोलिसांवर भडकले

अजूनही नेहरुंच्याच पुण्याईवर देश चाललाय; संजय राऊतांचा भाजपला टोला

(Congress leader Balasaheb Thorat slam Modi Government over various issues like petrol hike and corona)