भाजप आणि बजरंग दलाला ISI पैसे देते : दिग्विजय सिंह

भाजप आणि बजरंग दलाला पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय (ISI) पैसे पुरवते, असा धक्कादायक आरोप दिग्विजय सिंह यांनी भाजपावर केला आहे.

भाजप आणि बजरंग दलाला ISI पैसे देते : दिग्विजय सिंह

भोपाळ (मध्य प्रेदश) : भाजप आणि बजरंग दलाला पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय (ISI) पैसे पुरवते, असा धक्कादायक आरोप दिग्विजय सिंह यांनी भाजपावर केला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांच्या वक्तव्याने आज (1 सप्टेंबर) वाद निर्माण झाला आहे.

दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यावरुन सध्या सत्ताधारी भाजपने समाचार घेतला आहे. तसेच मध्य प्रदेशचे भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवरांज सिंह यांनीही दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यांवर टीका केली आहे.

“पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयसाठी मुस्लीम कमी आणि गैर मुस्लीम अधिक काम करत आहेत”, असंही दिग्विजय सिंह म्हणाले.

दिग्विजय सिंह यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी टीका केली. “दिग्विजय सिंह चर्चेत राहण्यासाठी असं वक्तव्य करत आहेत. ते आणि त्यांचे नेते पाकिस्तानची भाषा बोलतात. भाजप आणि आरएसएसची देशभक्ती सर्व जगाला माहित आहे”, असं शिवराज सिंह चौहान म्हणाले.

दिग्विजय सिंह यांनी केलेले ट्वीट

नुकतेच मध्य प्रदेशच्या पोलिसांनी दहशतवाद्यांना पैसे पुरविण्याच्या प्रकरणात 5 आरोपींना अटक केली होती. यावर दिग्विजय सिंह यांनी कमलनाथ सरकारला शुभेच्छा देत शिवराज सिंह, गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सल्लागार अजित डोभाल यांच्यावर निशाणा साधला.

“शिवराजजी आता सांगा देशद्रोही कोण आहे? पाकिस्तानसाठी गुप्त माहिती पुरविणाऱ्यांना वाचवणारा देशद्रोही आहे की नाही? अमित शाह, अजित डोभालजी देशद्रोही तर तुमच्या घरात आहेत”, असं ट्वीट दिग्विजय सिंह यांनी केले होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI