50 खोके, एकदम ओके म्हणणारा काँग्रेस नेता अखेर भाजपमध्ये, पक्ष प्रवेश करताच काय म्हणाले?

काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधून भाजपमध्ये जायचं चालू होतं पण मुहूर्त मिळत नव्हता. पण आज चांगला मुहूर्त मिळाला असं गोरंट्याल यांनी म्हटलं आहे.

50 खोके, एकदम ओके म्हणणारा काँग्रेस नेता अखेर भाजपमध्ये, पक्ष प्रवेश करताच काय म्हणाले?
kailas gorantyal
| Updated on: Jul 31, 2025 | 5:55 PM

काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी भाजपचे इतर नेतेही उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधून भाजपमध्ये जायचं चालू होतं पण मुहूर्त मिळत नव्हता. पण आज चांगला मुहूर्त मिळाला असं गोरंट्याल यांनी म्हटलं आहे.

पक्षप्रवेश करताना कैलास गोरंट्याल काय म्हणाले?

पक्षप्रवेश करताना कैलास गोरंट्याल म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधून भाजपमध्ये जायचं चालू होतं पण मुहूर्त मिळत नव्हता. पण आज चांगला मुहूर्त मिळाला. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत. आमचे मित्र संजय केनेकर किती दिवसांपासून माझ्या लागले होते की पक्षप्रवेश करा. त्यामुळे आज मी भाजपात प्रवेश करत आहे. मी तुम्हाला शब्द देतो की जालन्यात भारतीय जनता पार्टीचा महापौर होणार. जी उरलेली काही वर्ष आहेत त्यात मी भाजपची सेवा करेन.

50 खोक्यांवर काय म्हणाले?

कैलास गोरंट्याल हे शिवसेनेत फूट पडल्यानंतर 50 खोके, एकदम ओके अशी घोषणाबाजी करत होते. यावर बोलताना ते म्हणाले की, गम के आंसो में मुस्कुराके चलना पडता हैं. सियासत साजीशों की जाल हैं, मगर हर चाल जानकर चलान पडता हैं.

पुढे बोलताना कैलास गोरंट्याल म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरपासून मला प्रेरणा मिळाली. डीआरडीओने जलवा दाखवला, एकेकाळी आपण रशिया, अमेरिकेवर निर्भर होतो. पण आता डीआरडीओ देशी शस्त्रे बनवत आहे. मी भारतीय जनता पक्षात सेवेसाठी आलोय, पदासाठी नाही.

कैलास गोरंट्याल पुढे म्हणाले की, मी काँग्रेसमध्ये होतो तेंव्हाही रावसाहेब दानवे, अतुल सावे माझे मित्र होते. मी नवीन आमदार असताना मंत्रीपदात माझं नावं द्यायला पाहिजे होतं. रनींग आमदाराचे नाव तिसऱ्या यादीत होतं. फक्त तिकीट देऊन काही होत नाही, जी रणनीती करायला पाहिजे होती ती केली नाही. माझ्यासोबत जे आले ते इथे आहेत, जे आले नाहीत त्यांना आशिर्वाद आहेत. कुणाल पाटील, संग्राम जगताप माझे मित्र आहेत. तिकीट वाटपात चुक झाली, काँग्रेसच्या बंडखोराला मॅनेज करता आलं नाही. पार्टी वेगळी आहे, मी काय शिंदेगटात नाही भारतीय जनता पक्षात आहे. दानवे, लोणीकर, सावे माझे मित्र आहेत