मुख्यमंत्र्यांचा सर्वांशी संवाद, सरकार 5 वर्ष चालणार, भाजपने पाडून दाखवावं : नितीन राऊत

| Updated on: Jul 24, 2020 | 4:08 PM

"आमचे सरकार स्थिर आहे. ते पाच वर्ष पूर्ण करेल," असा विश्वास काँग्रेस नेते नितीन राऊतांनी व्यक्त (Nitin Raut On Maha Vikas Aghadi Government) केला.

मुख्यमंत्र्यांचा सर्वांशी संवाद, सरकार 5 वर्ष चालणार, भाजपने पाडून दाखवावं : नितीन राऊत
Follow us on

मुंबई : “आमचे सरकार स्थिर आहे. ते पाच वर्ष पूर्ण करेल,” असा विश्वास राज्याचे ऊर्जामंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊतांनी व्यक्त केला. “आम्ही तिन्ही पक्ष कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करून एकत्र आलो आहोत. त्यामुळे भाजपने हे सरकार पाडून दाखवावं,” असं आव्हानदेखील नितीन राऊतांनी केले. (Nitin Raut On Maha Vikas Aghadi Government)

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सगळ्यांशी संवाद साधत आहे. हे सरकार पूर्णवेळ चालेल. आमच्यात कोणतीही नाराज नाही. कोणाचीही मानहानी होत नाही. आमचे सरकार स्थिर असून ते पाच वर्ष पूर्ण करेल.  ज्यांना कोणाला हे सरकार पाडायचं असेल त्यांनी पाडून दाखवावं,” असं आव्हान नितीन राऊत यांनी केले.

“भाजप नेत्यांना त्यांचे नेते लक्ष देत नसतील. त्यामुळे मानहानी होत असेल,” असा टोलाही राऊतांनी लगावला.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

वर्क फॉर्म होम, लॉकडाऊनमुळे विजेचा वापर जास्त

त्याशिवाय वाढीव वीज बिलासंदर्भातही नितीन राऊतांनी स्पष्टीकरण दिलं. “महावितरण ही एक कंपनी आहे. कोरोनामुळे लोकांवर संकट आलं आहे. वर्क फॉर्म होम किंवा लॉकडाऊनमुळे घरी विजेचा वापर जास्त झाला हे नाकारता येत नाही. तीन महिने बिल जास्त आले, असा अनेक लोकांचा आरोप आहे. मात्र जे सरासरी बिल असतं तेच दिलेले आहे,” असे उर्जामंत्री म्हणाले.

“वीजबिलासंदर्भात भाजप जे आंदोलन करत ते चुकीचे आहे. केंद्र सरकार जी मदत देणार होतं. ती अद्याप दिलेली नाही. त्यामुळे त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करावे,” असे नितीन राऊत म्हणाले.

“लोकांना सवलत दिली आहे. जे घर बंद होते, तिथे वीजबिल नव्याने देत कमी करण्यात येईल. वीजबिलाचे हप्ते भरण्यासाठी वेळ दिला जाईल. वीजबिल भरताना 2 टक्के सूट असेल. वीज कट करू नये या सूचना दिल्या आहेत. पण वीजबिल देणे गरजेचे,” असे उर्जामंत्री नितीन राऊतांनी सांगितले.

“मुंबई आणि राज्यात जर वीजबिल भरले नाही म्हणून जे लाईट कट करत असतील. त्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही नितीन राऊत म्हणाले.  (Nitin Raut On Maha Vikas Aghadi Government)

संबंधित बातम्या : 

आघाडीतील नाराजीनंतर नितीन राऊतांची माघार, ऊर्जा खात्यातील अशासकीय नियुक्त्या रद्द

पवारांचा सल्ला म्हणजे सूचना, मुख्यमंत्र्यांकडून आदर होईल, शिवसेना स्टाईलवर नितीन राऊतांची प्रतिक्रिया