आघाडीतील नाराजीनंतर नितीन राऊतांची माघार, ऊर्जा खात्यातील अशासकीय नियुक्त्या रद्द

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Updated on: Jul 23, 2020 | 1:04 PM

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ऊर्जा खात्यात केलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत (Nitin Raut on appointments in Energy department).

आघाडीतील नाराजीनंतर नितीन राऊतांची माघार, ऊर्जा खात्यातील अशासकीय नियुक्त्या रद्द

Follow us on

मुंबई : राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ऊर्जा खात्यात केलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे (Nitin Raut on appointments in Energy department). महाविकासआघाडीतील मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सल्लामसलत न करता थेट नियुक्त्या केल्याचा आरोप करत नाराजी व्यक्त केल्याने या नियुक्त्या रद्द केल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील या नियुक्त्यांचा फेरविचार करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. यानंतर हा निर्णय झाला.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ऊर्जा खात्यात केलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीचा विषय वादात सापडला होता. महाविकासआघाडीतील मित्रपक्ष शिवसेना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मित्रपक्षांशी चर्चा न करता थेट निर्णय घेतल्याचा आरोप केला. मित्रपक्षांच्या नाराजीनंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी माघार घेत आपला निर्णय रद्द केला आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील टीव्ही 9 मराठीशी बोलताना या नियुक्त्यांचा फेरविचार करणार असल्याचं म्हटलं होतं. नियुक्त्यांवर कोणताही वाद नाही. मात्र, हे महाविकासआघाडी सरकार असल्याने सर्वांशी चर्चा करुन निर्णय घ्यावे लागतील, असे मत थोरात यांनी व्यक्त केलं होतं.

स्वतः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनीच नियुक्त्यांचा फेरविचार आणि मित्रपक्षांशी चर्चेचा मुद्दा महत्त्वाचा म्हटल्यानंतर या नियुक्त्या तात्काळ रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता नव्याने या जागेवर कुणाच्या नियुक्त्या होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

दरम्यान, याआधी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील अशाचप्रकारे थेट पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले होते. मात्र, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आक्षेप घेतला गेल्यानंतर या बदली रद्द करण्यात आल्या होत्या. आता ऊर्जा खात्यातील या नियुक्त्या रद्द झाल्याने महाविकासआघाडीतील संवादावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

संबंधित व्हिडीओ :


हेही वाचा :

ग्रामपंचायत प्रशासक नेमणुकीवर कोर्टाने दणका दिल्याचे वृत्त खोटे, हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण

Maratha Morcha Live | औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन, काही आंदोलक ताब्यात

Pune Lockdown | पुण्यात लॉकडाऊनचा अखेरचा दिवस, पुढील नियमावली काय?

Nitin Raut on appointments in Energy department

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI