Maratha Morcha Live | औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन, काही आंदोलक ताब्यात

मराठा क्रांती ठोक मोर्चाने (Maratha Kranti Thok Morcha) विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु केलं. काकासाहेब शिंदे यांच्या बलिदान दिनानिमित्त आंदोलन होत आहे.

  • दत्ता कानवटे, टीव्ही 9 मराठी, औरंगाबाद
  • Published On - 10:57 AM, 23 Jul 2020
Maratha Morcha Live | औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन, काही आंदोलक ताब्यात

औरंगाबाद : मराठा क्रांती ठोक मोर्चाने (Maratha Kranti Thok Morcha) विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु केलं. काकासाहेब शिंदे यांच्या बलिदान दिनानिमित्त कायगाव टोका इथं हे आंदोलन केलं जात आहे. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही, तरीही आंदोलन करण्यावर क्रांती मोर्चा ठाम आहे. आंदोलन सुरु केल्याने पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं. (Maratha Agitation Aurangabad)

मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सकाळी आंदोलनाच्या दिशेने रवाना झाले. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. पोलिसांनी आंदोलकांना गंगापूर फाटा येथे अडवले. पोलिसांनी आंदोलकांना काकासाहेब शिंदे समाधीस्थळी जाण्यास मज्जाव केला. कायगाव टोका इथे आंदोलक जाणार आहेत. मात्र पोलिसांनी आंदोलकांना गंगापूर फाटा इथेच रोखल्याने आंदोलकांनी तिथेच ठिय्या दिला. पोलिसांनी या भागात संचारबंदी लागू केली आहे.(Maratha Agitation Aurangabad)

मराठा आंदोलनासाठी बलिदान देणाऱ्या काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी, कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी द्यावी या आणि अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जात आहे.

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण : मुख्यमंत्री

दरम्यान, मराठा आरक्षण खटल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि ओबीसी नेत्यांची बैठक नुकतीच पार पडली होती. या बैठकीत ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती.

“मराठा आरक्षणाचा खटला सर्वोच्च न्यायालयात सुरु (CM Uddhav Thackeray On OBC Reservation) आहे. उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात मान्य झाला तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल ही भीती ओबीसी समाजाला वाटते ती त्यांनी मनातून काढून टाकावी. मी ॲडव्होकेट जनरल यांच्याशी चर्चा केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का बसणार नाही,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

(Maratha Agitation Aurangabad)

संबंधित बातम्या 

OBC Reservation | ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण, मुख्यमंत्र्यांची ग्वाही   

Maratha Reservation | मराठा आरक्षण वैध ठरवण्यासाठी ठाकरे सरकारची मोर्चेबांधणी, मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली