Congress Meeting CM Live | काँग्रेस नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, तासभर खलबतं

| Updated on: Jun 18, 2020 | 4:07 PM

सत्तेत सहभागी असूनही निर्णयप्रक्रियेत सामील केले जात नसल्यावरुन काँग्रेस नेते नाराज आहेत. (Congress Ministers get Meeting Appointment with CM Uddhav Thackeray)

Congress Meeting CM Live | काँग्रेस नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, तासभर खलबतं
Follow us on

मुंबई : काँग्रेसच्या नाराज मंत्र्यांना अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची दुपारी दोनच्या सुमारास मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीला सुरुवात झाली. (Congress Ministers get Meeting Appointment with CM Uddhav Thackeray) या बैठकीपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत हे मातोश्रीवर पोहोचले. त्यानंतर बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाणही मातोश्रीमध्ये दाखल झाले.

त्यानंतर काँग्रेस नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत जवळपास तासभर चर्चा झाली.

काँग्रेसच्या बैठकीतल्या मागण्या

-न्याय्य योजनेची अंमलबजावणी
-निधी वाटपात योग्य प्रकारे स्थान
-निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घेणे
-विधानपरिषद जागावाटपाचा मुद्दा

जवळपास गेल्या आठवड्याभरापासून काँग्रेस नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत होते. सत्तेत सहभागी असूनही निर्णयप्रक्रियेत सामील केले जात नसल्यावरुन काँग्रेस नेते नाराज आहेत. आपली खदखद मांडण्यासाठी सोमवारी त्यांनी भेट घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ती भेट टळली होती.

हेही वाचा : शिवसेना खासदार अनिल देसाई थोरातांच्या भेटीला, मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वीच नाराजी दूर करण्याचे प्रयत्न?

महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही निर्णय घेताना काँग्रेसला विचारात घेतलं जात नाही, अशी नाराजी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची स्वतंत्र बैठकही झाली होती. या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस नेते आपली बाजू मुख्यमंत्र्यांकडे मांडतील, अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिली होती. आम्हाला मुख्यमंत्र्यांना समोरासमोर भेटायचं आहे. आमचे प्रश्न हे जनतेशी निगडित आहेत, असेही ते म्हणाले होते.

काँग्रेसच्या प्रमुख मागण्या काय?

  • महाविकास आघाडी सरकार कोणताही निर्णय घेत असताना काँग्रेसला विचारात घेतलं जावं
  • तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे सत्तेत समान वाटा मिळावा, समान न्याय व्हावा

बाळासाहेब थोरात यांच्यापाठोपाठ अशोक चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीदेखील याबाबत नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसचा वाढता नाराजीचा सूर लक्षात घेऊन अनिल देसाई यांनी बाळासाहेब थोरातांची भेट घेतली.

हेही वाचा : खाटेचे कुरकुरणे समजून घ्या, पूर्ण माहिती घेऊन पुन्हा अग्रलेख लिहा, बाळासाहेब थोरातांचे ‘सामना’ला उत्तर

शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार अनिल देसाई यांनी काल बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. अनिल देसाई यांनी थोरातांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली.  (Congress Ministers get Meeting Appointment with CM Uddhav Thackeray)

“काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा त्यांना अनुभव आहे. सगळ्यांच्या गळ्यात मंत्रीपदाचे हार पडले आहेत. त्यात शिवसेनेचा त्यागही मोलाचा आहे हे विसरता येणार नाही. खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करु नये” अशा शब्दात काँग्रेसच्या नाराजीनाट्यावर ‘सामना’च्या अग्रलेखातून दोन दिवसांपूर्वी भाष्य करण्यात आले होते.

पाहा व्हिडीओ :


(Congress Ministers get Meeting Appointment with CM Uddhav Thackeray)