काँग्रेस सोडणार नाही, भाजप प्रवेशास विनम्र नकार : आमदार राहुल बोंद्रे

| Updated on: Sep 29, 2019 | 11:39 PM

आमदार राहुल बोंद्रे यांनीच या वृत्ताला फेटाळले आहे. मी काँग्रेस सोडणार नाही. भाजप प्रवेशास माझा विनम्रपणे नकार आहे, अशी भूमिका बोंद्रे यांनी स्पष्ट केली.

काँग्रेस सोडणार नाही, भाजप प्रवेशास विनम्र नकार : आमदार राहुल बोंद्रे
Follow us on

बुलडाणा : विधानसभा निडवणुकीच्या (Maharashtra Assembly Election) पार्श्वभूमीवर भाजपमध्ये (BJP) मेगाभरती  होणार असल्याची चर्चा आहे. यात बुलडाणा जिल्ह्यातील काँग्रेस आमदार राहुल बोंद्रे (Congress MLA Rahul Bondre) यांच्याही नावाचा समावेश होता. मात्र, स्वतः आमदार राहुल बोंद्रे यांनीच या वृत्ताला फेटाळले आहे. मी काँग्रेस सोडणार नाही. भाजप प्रवेशास माझा विनम्रपणे नकार आहे, अशी भूमिका बोंद्रे यांनी स्पष्ट केली.

राहुल बोंद्रे म्हणाले, “जेव्हा एकाच वेळी सगळीकडे एकच बातमी येते, तेव्हा ती बातमी नियोजितपणे पेरलेली असते, हे सांगण्याची आवश्यकता नाही. आज (29 सप्टेंबर) दिवसभर मी भाजपमध्ये जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. अशा बातम्या मागील 3 महिन्यांपासून सातत्याने दाखवण्यात येत आहे. मी त्याचं सातत्यानं खंडणही करत आलो आहे. आज पुन्हा एकदा मी या बातमीचं स्पष्टपणे खंडन करतो. मी काँग्रेस सोडणार नाही. भाजप प्रवेशास माझा विनम्रपणे नकार आहे.”

चिखली विधानसभा मतदारसंघात आणि बुलडाणा जिल्ह्यात काँग्रेस पक्ष ज्या कुणाला उमेदवारी देईल त्यांचं काम मी संपूर्ण शक्तिनिशी करेल, असंही बोंद्रे यांनी नमूद केलं आहे.

आमदार राहुल बोंद्रे यांच्याकडे बुलडाणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपदही आहे. त्यांनी सोमवारी (30 सप्टेंबर) कृषी उत्पन्न बाजार समिती, चिखली येथे त्यांच्या कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक देखील आयोजित केली आहे. त्यातही ते आपली राजकीय भूमिका कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवणार असल्याचं सांगितलं जात आहे.