AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Goa politics : फुटीच्या भीतीने काँग्रेसने आमदारांना अज्ञातस्थळी हलवले; मुकुल वासनिक गोव्यात दाखल

महाराष्ट्रानंतर आता गोव्यातही राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधील (Congress) आमदारांचा गट भाजपाच्या (bjp) संपर्कात आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून काँग्रेसने आपले आमदार अज्ञातस्थळी हलवले आहेत.

Goa politics : फुटीच्या भीतीने काँग्रेसने आमदारांना अज्ञातस्थळी हलवले; मुकुल वासनिक गोव्यात दाखल
| Updated on: Jul 11, 2022 | 9:20 AM
Share

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तानाट्यानंतर आता गोव्यातही मोठा राजीकय भूकंप पहायला मिळत आहे. गेव्यात माजी मुख्यमंत्री दिगबंर कामत आणि विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्यासह काही आमदार भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसच्या (Congress) गोटात खळबळ माजली आहे. काँग्रेसकडून या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली आहे. पक्षाने मायकल लोबो (Michael Lobo) यांची विरोधी पक्षनेतेपदावरून हकालपट्टी केलीये. तसेच कामत आणि लोबो यांच्यावर लवकरच काँग्रेसच्या वतीने कारवाई होणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसकडून सावध पाऊले उचलण्यात येत असून, पक्षाने आपल्या 5 आमदारांना काल मध्यरात्री अज्ञात स्थळी हलवले आहे. तसेच आमदारांनी बंडखोरी करू नये यासाठी त्यांचे मन ओळवण्यात येत असून, अध्यक्षा सोनिया गांधी यांनी खासदार मुकुल वासनिक यांना डॅमेज कंट्रोलसाठी गोव्यात पाठवले आहे. आजपासून गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनला सुरुवात होणार आहे.

अपात्रता टाळण्यासाठीचे गणित काय?

काँग्रेसच्या गोटातून फूटून जर आठ आमदार भाजपामध्ये दाखल झाले तर या आमदारांवर पक्षांतर्गत बंदी कायद्याद्वारे कारवाई करता येणार नाही. लोबो आणि कामत गटाकडे सध्या पाच आमदार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना आणखी तीन आमदारांची गरज आहे. काँग्रेसमधील तीन आमदार जर लोबो, कामत गटात सहभागी झाले तर आमदारांची एकूण संख्या आठ होणार आहे. त्यामुळे या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करता येणार नाही. जे आमदार काँग्रेसमधून भाजपात सहभागी होणार आहेत, त्यातील दोघांना मंत्रीपद तर एकाला उपसभापतीपद देण्याचे नियोजन भाजपाने केले आहे. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्राप्रमाणेच गोव्यात देखील राजकीय नाट्य पहायला मिळू शकते.

दिग्विजय सिंहांचा भाजपाला टोला

दरम्यान सध्या महाराष्ट्र आणि गोव्यात सुरू असलेल्या सर्व प्रकरणावरून काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी भाजपाला टोला लगावला आहे. सध्या महाराष्ट्रात जो खळे सुरू आहे, तो काही नवीन नाही. पैशांच्या जोरावर असे खेळ खेळले जातात. याची सुरुवात 2017 ला झाल्याची टीका सिंह यांनी केली आहे. ते पुढे बोलताना म्हटले की सध्या भारतात लोकतंत्र राहिले नसून धनतंत्र झाले आहे. तसेच त्यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्री पदावर देखील प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस यांना भाजपाने जाणून बूजून उपमुख्यमंत्रीपद दिले. हा फडणवीस यांचा अपमान आहे. मी जर त्यांच्या जागी असतो तर मी कधीही उपमुख्यमंत्री झालो नसतो असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.

मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.